Kartik Purnima 2022 Messages in Marathi: कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त WhatsApp Status, Wishes, Greetings, SMS, Images द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या खास शुभेच्छा!
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान शिव-पार्वती, गणेश, कार्तिकेय आणि नंदीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त WhatsApp Status, Wishes, Greetings, SMS, Images द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास मंगलमय दिवसाच्या खास शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा - Lunar Eclipse: पौर्णिमेला या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची वेळ, कालवधी आणि सविस्तर माहिती)
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघोही दिशा
घेवोनि येवो नवी उमेद नवी आशा,
तुम्हा आणि तुमच्या परिवाराला त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख, लुकलुकणारा,
चांदण्याचा किरणांचा सोनेरी अभिषेक
सारे रोजचे तरी भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली
शब्दांचीही सुमने फुलती,येता घरोघरी दिवाळी
देव दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
नव्या सणाला उजळू दे आकाश,
सर्वत्र पसरु दे लख्ख प्रकाश,
आज कार्तिक पौर्णिमेचा सण खास,
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
तिमिराकडून तेजाकडे नेणारा सण
दाखवतो प्रकाशाची वाट
नवी उमेद काळजी पुसण्याची, नात्याचे रेशीम बंध घट्ट करण्याची
प्रकाश हा उत्सव, आपले आयुष्य उजळून टाको,
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करण्याचे मोठे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की, ही तारीख सृष्टीच्या सुरुवातीपासून खूप खास आहे. पुराणांमध्ये, हा दिवस स्नान, उपवास आणि तपस्या या संदर्भात मोक्ष प्रदान करणारा आहे. त्याचे महत्त्व केवळ वैष्णव भक्तांसाठीच नाही तर शैव भक्तांसाठीही आहे.