Best Places To Celebrate New Year 2023: भारतातील 'या' ठिकाणी अतिशय अप्रतिम पद्धतीने केलं जातं नववर्षाचे स्वागत; तुम्हीही येथे जाऊन लुटू शकता Celebration आनंद
अशा परिस्थितीत तुम्हालाही नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे नवीन वर्ष मोठ्या थाटात साजरे केले जाते.
Best Places To Celebrate New Year 2023: जगभरातील अनेक देशांमध्ये नवीन वर्ष (New Year 2023) मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते. दरवर्षी 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनची छायाचित्रे सोशल मीडियावर दिसतात. यात लोक नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेले दिसतात. असे मजेदार उत्सव पाहून प्रत्येकाला त्यात सामील व्हावेसे वाटते. नवीन वर्षात फार दिवस उरले नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हालाही नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे नवीन वर्ष मोठ्या थाटात साजरे केले जाते. भारतातील काही शहरांमध्ये नवीन वर्षाचा उत्सव खूप उत्साही असतो. सर्वप्रथम, भारतातील कोणत्या शहरांमध्ये नवीन वर्ष सर्वात अप्रतिम पद्धतीने साजरे केले जाते ते जाणून घ्या, जेणेकरून तुम्हीही तेथे जाऊन नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये सामील व्हालं.
गोवा -
नवीन वर्षाची सुरुवात संस्मरणीय पद्धतीने करायची असेल, तर भारतातील एक ठिकाण म्हणजे गोवा. गोवा नाईट लाइफ आणि पार्टीसाठी प्रसिद्ध आहे. ख्रिसमसपासून नववर्षापर्यंत प्रत्येक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते. नववर्षानिमित्त गोव्यात बीच पार्ट्या, क्रूझ पार्ट्या आयोजित केल्या जातात. याशिवाय गोव्यातील चर्चमध्ये वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी असते. मोठ्या आवाजात संगीत, खाद्यपदार्थ आणि छान हवामानात समुद्रकिनाऱ्यावरील आनंदासाठी गोवा हे नवीन वर्षाचे योग्य ठिकाण आहे. (हेही वाचा - New Year’s Eve Fireworks 2022 Live Streaming Online: सिडनी, सिंगापूर, लंडन आणि दुबई येथून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फटाक्यांच्या आतिषबाजीचा कार्यक्रम कसा पाहावा? येथे पहा लाइव्ह स्ट्रीमिंग)
मनाली -
मनालीमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने देश-विदेशातील प्रवासी दाखल होतात. नवीन वर्षात मनालीमध्ये खूप गर्दी असते. तेथे अनेक पार्ट्या आयोजित केल्या जातात. बर्फवृष्टी आणि सुंदर टेकड्यांमध्ये लोक पार्टीचा आनंद लुटतात.
उटी -
तमिळनाडूच्या उटी या सुंदर हिल स्टेशनमध्येही नवीन वर्ष खूप मजेदार पद्धतीने साजरे केले जाते. तुम्हाला सुंदर नैसर्गिक दृश्ये आणि हिरवाईमध्ये मोठ्या आवाजात संगीत, आकर्षक पार्टी आणि गर्दीसह उत्सवाचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही नवीन वर्षासाठी ऊटीला जाऊ शकता.
गुलमर्ग -
निसर्गसौंदर्यामुळे जगाचे नंदनवन मानले जाणारे गुलमर्ग हे नवीन वर्ष साजरे करण्यासाठीही उत्तम ठिकाण आहे. नववर्षाला केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक येथे येतात. पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेल्या या शहरात तुम्हाला शांततेचा आनंद लुटता येईल. गुलमर्ग नवीन वर्षात भेट देण्याचा उत्तम पर्याय आहे.
मॅक्लॉडगंज -
या प्रसिद्ध हिल स्टेशनवर नवीन वर्ष अतिशय सुंदर पद्धतीने साजरे केले जाते. येथे अनेक तात्विक ठिकाणे आहेत, क्लासिक कॅफे आहेत, जिथे अनेक कार्यक्रम होतात. मॅक्लॉडगंज धर्मशाळेजवळ स्थित आहे, जिथे तिबेटी स्मरणिका आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री मॅक्लॉडगंजच्या रस्त्यावर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा पूर्ण आनंद लुटण्यासाठी नक्की जा.