Teachers' Day 2020 Greetings Cards: शिक्षक दिनी लाडक्या शिक्षकांना सरप्राईज देण्यासाठी अशा पद्धतीने घरच्या घरी बनवा ग्रिटिंग कार्ड्स! (Watch DIY Videos)

कारण या दिवशी प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्यातील शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो. वंदन करतो आणि त्यांना एखादं छानसं गिफ्ट देऊन त्यांच्या प्रती भावना व्यक्त करतो.

Teacher's day greeting cards (Photo Credits: YouTube grab)

शिक्षक दिन (Teachers Day) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतात 5 सप्टेंबर (5 September) रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.  महान शिक्षक भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंती दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक दिन हा देशभरातील सर्व शिक्षकांच्या योगदानाबद्दल त्यांना समर्पित करण्यात आला आहे. शिक्षक दिन शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठीही खास असतो. कारण या दिवशी प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्यातील शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो. वंदन करतो आणि त्यांना एखादं छानसं गिफ्ट देऊन त्यांच्या प्रती भावना व्यक्त करतो. गिफ्टसोबत तुम्ही बनवलेले ग्रिटींग कार्ड असेल तर उत्तमच.

यंदा शिक्षक दिनानिमित्त तुम्ही घरच्या घरी शुभेच्छापत्रं बनवून शिक्षकांना सरप्राईज देऊ शकता. तुम्ही स्वतः बनवलेले ग्रिटिंग कार्ड आणि त्यातील संदेश शिक्षकांना नक्कीच आनंदीत करेल. तसंच तुमच्या क्रिएटीव्हीला देखील वाव मिळेल. घरच्या घरी ग्रिटिंग कार्ड्स बनवण्यासाठी हे काही खास व्हिडिओज तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.  (कोरोनाच्या सावटाखाली यंदा शिक्षक दिन सुरक्षित साजरा करण्यासाठी ऑनलाईन सेलिब्रेशनचे काही हटके पर्याय!)

पहा व्हिडिओज:

शिक्षक दिनानिमित्त शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमातून शिक्षकांबद्दलचा आदर, सन्मान व्यक्त केला जातो. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे शाळा-कॉलेजेस बंद आहेत. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु आहे. अशावेळी शिक्षक दिन तुम्ही व्हर्च्युअल माध्यमातूनही सेलिब्रेट करु शकता.