IPL Auction 2025 Live

Diwali Gifts 2019: दीपावलीला तुमच्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी घ्या ‘हे’ खास गिफ्ट्स

या सणानिमित्त आपली सर्व मित्र आणि नातेवाईकांची भेट होत असते. त्यामुळे त्यांना दिपावलीचे गिफ्ट्स काय द्यायचे? हा प्रश्न सर्वांनाच प्रत्येक दिपावलीला पडत असतो. परंतु, तुमच्या गिफ्ट्स खरेदीचा गोंधळ आता कमी होणार आहे. कारण, आम्ही तुमच्यासाठी काही गिफ्ट्स आयडिया घेऊन आलो आहोत.

Take this Diwali Special Gifts for Your Friends and Relatives (Photo Credit - File Photo)

दीपावली (Diwali) हा सर्वांच्याच आवडीचा सण आहे. या सणानिमित्त आपली सर्व मित्र आणि नातेवाईकांची भेट होत असते. त्यामुळे त्यांना दीपावलीचे गिफ्ट्स (Diwali Gifts) काय द्यायचे? हा प्रश्न सर्वांनाच प्रत्येक दीपावलीला पडत असतो. परंतु, तुमच्या गिफ्ट्स खरेदीचा गोंधळ आता कमी होणार आहे. कारण, आम्ही तुमच्यासाठी काही गिफ्ट्स आयडिया (Gifts Ideas) घेऊन आलो आहोत. हे गिफ्ट्स तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की आवडतील आणि त्यांच्या नक्की उपयोगात येतील. या खास लेखातून आम्ही तुम्हाला अशाच दिपावली गिफ्ट्स ट्रेंडविषयी सांगणार आहोत. चला मग जाणून घेऊयात या गिफ्ट्सविषयी.

हेही वाचा - Diwali 2019 Rangoli Designs: यंदाच्या दिवाळीला अंगणात सुरेख रांगोळी काढण्यासाठी पहा 'या' सोप्या पद्धती (Watch Video)

सुक्यामेव्याची पाकिटे –

Photo Credit - Pixabay.com

दीपावलीला गिफ्ट्स म्हणून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सुक्यामेव्याची पाकिटेही देऊ शकता. थंडीच्या दिवसात सुक्या मेवा खाल्ल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. या पाकिटामध्ये काजू, बदाम, खारीक, अक्रोड यांचा समावेश असतो. अलीकडे अशी सुक्यामेव्याची पाकिटे देण्याची प्रथा वाढली आहे. तसेच सुकामेवा आरोग्यासाठी उत्तमचं असतो.

चॉकलेट गिफ्ट हॅम्पर्स –

Photo Credit - Twitter

आपल्याकडे दीपावलीला नातेवाईकांना फराळ देण्याचीही प्रथा आहे. परंतु, याला उत्तम पर्याय म्हणून तुम्ही चॉकलेटचे हॅम्पर्सही देऊ शकता. चॉकलेट ही अशी गोष्ट आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. त्यामुळे तुमच्यासाठी चॉकलेट गिफ्ट हॅम्पर्स उत्तम गिफ्ट ठरू शकते.

हेही वाचा - Diwali 2018 : भाऊबीज दिवशी कोणत्या मुहूर्तावर ओवाळणी करणं अधिक शुभ ठरेल ? ओवाळणीच्या ताटात काय काय असायला हवेच ?

घरी बनवलेल्या शोभेच्या वस्तू -  

Photo Credit - File Photo

तुम्ही खास दीपावलीसाठी घरी बनवलेल्या शोभेच्या वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता. जसे की, रंगेबीरंगी पणत्या, आकाशदिवे, या वस्तू तुमच्या नातेवाईकांच्या तसेच मित्रांच्या नक्की उपयोगात येतील.

डायमंड ज्वेलरी –

Photo Credit - Twitter

तुम्ही तुमच्या मैत्रिणीला किंवा बहिणीला या दिवाळीला डायमंड ज्वेलरी गिफ्ट करू शकता. अलीकडे महिला सोन्यांच्या दागिन्यापेक्षा डायमंड ज्वेलरीला जास्त पसंती दर्शवतात. यामध्ये तुम्ही डायमंडच्या बांगड्या, गळ्यातील डायमंड सेट्स, ब्रेसलेट, ईयररिंग आदि वस्तू गिफ्ट्स म्हणून देऊ शकता.

दीर्घकाळ लक्षात राहतील अशा वस्तू निवडा –

काही वस्तू पाहिल्या की, आपल्याला त्या व्यक्तीची आठवण होते. त्यामुळे तुम्ही दीर्घकाळ टिकतील अशा वस्तूंची निवड करा. तुम्ही तांबे किंवा चांदीच्या वस्तूही देऊ शकता. समई, निरांजन, ताम्हण, आदी वस्तू घरात नेहमी उपयोगी पडतात.

अशाप्रकारे वर सांगितलेली गिफ्ट्स तुम्ही आपल्या नातेवाईकांना देऊ शकता आणि ही दीपावली अविस्मरणीय बनवू शकता.