Swami Vivekananda Jayanti 2023: स्वामी विवेकानंद जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे 5 महत्त्वपूर्ण संदेश, जे ठरतील आयुष्यासाठी महत्त्वाचे

हा दिन 12 जानेवारी रोजी येतो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विवेकानंद यांच्या विचारांना माणणारे लोक एकमेकांना शुभेच्छाही देतात

Swami Vivekananda (Photo Credits : Wikimedia Commons)

स्वामी विवेकानंद जयंती (Swami Vivekananda Jayanti 2023) दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day 2023) म्हणून साजरी केली जाते. हा दिन 12 जानेवारी रोजी येतो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विवेकानंद यांच्या विचारांना माणणारे लोक एकमेकांना शुभेच्छाही देतात. शिवाय, विविध कार्यक्रमांमधून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. आपणही त्यांच्या जयंतीनिमित्त काही विचार जाणून घेऊ सकता. जे आपल्याला सदैव प्रेरणा देऊ शकतील आणि आयुष्यात फायदेशीरही ठरु शकतील.

स्वामी विवेकानंद यांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. अगदी लहान वयातच नरेंद्रनाथांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला होता. आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केल्यानंतर ते स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे वडील कलकत्ता उच्च न्यायालयात वकील होते आणि आई धार्मिक स्त्री होती. भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार रामकृष्ण मिशन, रामकृष्ण मठ आणि त्याच्या अनेक शाखा केंद्रांवर दरवर्षी स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस साजरा केला जातो



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif