Surya Grahan 2 July 2019: जगातील काही भागात उद्या दिसणार खग्रास सूर्य ग्रहण, जाणून घ्या भारतात पुन्हा कधी येणार योग?

उद्या आषाढ महिन्यातील अमावास्येला म्हणजेच 2 जुलै 2019 ला जागतेल काही भागात खग्रास सूर्यग्रहण पाहता येणार आह, भारयीय वेळेनुसार ग्रहणाची वेळ मध्यरात्री असल्याने प्रत्यक्ष दर्शन घडणार नाही.

Total Solar Eclipse (Photo Credits: Pixabay)

उद्या, म्हणजेच 2 जुलै 2019 (2 nd July 2019) ला आषाढ महिन्यातील अमावस्येच्या मध्यरात्रीपासून खग्रास सूर्य ग्रहण (Solar Eclipse)  लागणार आहे. हे या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असणार आहे. सूर्य (Sun) , पृथ्वी (Earth)  आणि चंद्र (Moon)  यांच्या खगोलिय हालचालींवरून जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा त्याच्या सावलीने पूर्ण ग्रहणाची परिस्थिती निर्माण होते. उद्याचे सूर्यग्रहण हे याच परिस्थितीने 4  मिनिटे 33 सेकंद साठी पाहायला मिळणार आहे. अर्जेंटिना (Argentina) मध्ये ग्रहणाचे सर्वात स्पष्ट दर्शन घडेल . भारतीय वेळेप्रमाणे ग्रहण रात्री 10 वाजून 25 मिनिटाने सुरु होणार आहे, यावेळेस ग्रहण रात्री असल्याने प्रत्यक्ष दर्शन घडणार नाही आणि परिणामी प्रभाव कमी राहील त्यामुळे विशेष काळजी घ्यायची गरज नाही.

या ठिकाणी दिसणार सूर्यग्रहण

जगातील काही भागांमध्ये पूर्ण सूर्यग्रहण अवघ्या साडेचार मिनिटांपुरतेच दिसणार आहे. सूर्यास्ताच्या आधी चिले आणि अर्जेंटिना या छोट्या शहरांमध्ये या ग्रहणाचे स्पष्ट दर्शन घडेल. तर त्यापाठोपाठ संध्याकाळी पॅसिफिक आणि दक्षिण अमेरिका, इक्वाडोर,ब्राझील सह उरुग्वे मध्ये ग्रहण पाहता येईल.

हे ही वाचा - जुलै महिन्यात भारतात साजरे होतात हे उत्सव; पावसाळ्यात फिरण्यासोबत जाणून घ्या देशाची संस्कृती

2019 मध्ये पुन्हा कधी जुळणार ग्रहणाचा योग?

शास्त्रज्ञांच्या मते, 2019 मध्ये एकूण 5 वेळा ग्रहणाचा योग्य जुळून येणार आहे यामध्ये तीन सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण यांचा समावेश असेल. भारतात मात्र यापैकी केवळ ग्रहणे प्रत्यक्ष पाहायला मिळतील. उद्याचे खग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही मात्र याच महिन्यातील 16 तारखेला असणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतात पाहायला मिळू शकते. याशिवाय वर्षाच्या शेवटी 26 डिसेंबरला आणखीन एक सूर्यग्रहण होणार आहे. त्यावेळीस हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल हे ग्रहण फक्त दक्षिण भारतातील काही भागांमध्येच दिसेल. ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसेल तेथेच ग्रहणाचे नियम आणि मान्यता प्रभावी राहतील.

दरम्यान, ज्योतिषांच्या माहितीनुसार यावेळेस ग्रहणाचे प्रत्यक्ष दर्शन घडणार नसले तरी काही राशींवर अप्रत्यक्षपणे प्रभाव कायम राहू शकतो. त्यामुळे या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करण्याचा पर्यटन करावा. तसेच 3  जुलै ला सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जलार्पण करून देवी देवतांची पूजा करावी.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif