सुबोध भावे सांगत आहे मकरसंक्रांत साजरा करण्यामागची खरी गोष्ट
दार वर्षी हा सण 14 जानेवारी रोजी येतो. परंतु, यंदा मात्र मकरसंक्रांत 15 जानेवारी रोजी येणार आहे कारण सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 जानेवारीला येतो.
Importance of Makar Sankranti: नवं वर्ष सुरु होताच पहिला सण येतो तो मकरसंक्रांतीचा. दार वर्षी हा सण 14 जानेवारी रोजी येतो. परंतु, यंदा मात्र मकरसंक्रांत 15 जानेवारी रोजी येणार आहे कारण सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 जानेवारीला येतो. आपल्या देशात विविध ठिकाणी हा सण साजरा केला जात असला तरी प्रत्येक ठिकाणी या सणाचे नाव वेगळे आहे. परंतु, मकरसंक्रांत हा सण नक्की का साजरा केला जातो याबद्दल तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना. तर याचं उत्तर देणार आहे सर्वांचा लाडका सुबोध दादा.
अभिनेता सुबोध भावे याने लहान मुलांसाठी एक खास युट्युब चॅनल सुरु केले आहे. यात त्याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यावर त्याने सोशल मीडियावर लिहिले, "तिळगुळ घ्या आणि गोड बोला” या वाक्यापलीकडे जाऊन मकर संक्रांत म्हणजे नक्की काय आपण ही का साजरी करतो ह्याची सखोल माहिती जर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगायची असेल तर तुम्हाला आजची गोष्ट ऐकायलाच हवी... आज सकाळी ९:०० वाजता नक्की बघा माझ्या सुबोध भावे या युट्युब चॅनेल वर."
सुबोधने अगदी योग्य शब्दात या मकरसंक्रांत या सणाचे महत्त्व सांगितले आहे. पहा सुबोधचा हा व्हिडिओ,
दरम्यान, दक्षिण भारतात मकरसंक्रांत हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो, उत्तरेकडे लोहरी म्हणून तर गुजरातमध्ये उत्तरायण, माघी, खिचडी या नावाने देखील तो ओळखला जातो. तसेच भारताबाहेरही हा सण साजरा होतो. नेपाळमध्ये याला माघी किंवा माघी संक्रात, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते.