Student Day 2020 Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार Messages, Greetings द्वारे शेअर करुन द्या विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा!
अशा वेळी तुम्ही सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
आजचा दिवस (7 नोव्हेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस (Student Day 2020) म्हणून साजरा केला जातो. त्याला कारणही तितके विशेष आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) याच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित करण्यात आले. अतिशय हुशार, कुशाग्र, तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज 7 नोव्हेंबर 1900 रोजी शालेय जीवनास सुरुवात केली. म्हणून हा दिवसच विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त काही शाळांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्यात भाषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगितले जातात. मात्र यंदा कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे ते कार्यक्रम होऊ शकत नाही. अशा वेळी तुम्ही सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्येक भाषण, त्यांचे विचार हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. त्यात त्यांनी शिक्षण आणि साक्षर असणे या गोष्टींवर विशेष भर दिला आहे. जो आजच्या आणि पुढे येणा-या पिढीसाठी खूपच फायदेशीर ठरेल. म्हणूनच आज विद्यार्थी दिवसानिमित्त जाणून घेऊया त्याचे शिक्षणाविषयीचे विचार
शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे
बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्याईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे म्हणून तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी, यासाठी शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे हे शिक्षणासंबंधीचे विचार विद्यार्थ्यांना कायमच मार्गदर्शक ठरावे हीच अपेक्षा!