IPL Auction 2025 Live

Shravani Somvar 2024 Dates: महाराष्ट्रात श्रावणी सोमवार व्रत यंदा 5 ऑगस्टपासून; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?

त्यानंतर शिवमूठ देखील दिली जाते.

Happy Shravan Maas 2024 (File Image)

श्रावण (Shravan)  महिन्यात अनेक व्रत वैकल्य असतात. यंदा श्रावण महिन्याची आणि सोमवार च्या व्रतांची सुरूवात एकत्रच होणार आहे. येत्या 5 ऑगस्ट पासून त्याची सुरूवात होणार आहे. 5 ऑगस्ट पासून श्रावणारंभ आहे सोबतच पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारी शिवमूठ (Shiv Muth) भगवान शंकराला अर्पण केली जातात. यानिमित्ताने जवळच्या भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते.

श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केले जाते. त्यानंतर शिवमूठ देखील दिली जाते. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते. मग यंदा पहा कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ असणार आहे?

श्रावणी सोमवार 2024 तारखा आणि शिवमूठ

पहिला श्रावणी सोमवार - 5 ऑगस्ट 2024 - तांदूळ शिवमूठ

दुसरा श्रावणी सोमवार - 12 ऑगस्ट 2024 - तीळ शिवमूठ

तिसरा श्रावणी सोमवार - 19 ऑगस्ट 2024 - मूग शिवमूठ

चौथा श्रावणी सोमवार - 26 ऑगस्ट 2024 - जव शिवमूठ

पाचवा श्रावणी सोमवार - 2 सप्टेंबर 2024 - सातू शिवमूठ

चातुर्मासामध्ये श्रावण हा सर्वात पवित्र महिना आहे. अनेक शिवभक्त श्रावणी सोमवारी उपवास करतात. एक वेळेस जेवण करून संध्याकाळी व्रत सोडण्याची रीत आहे. समुद्रमंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन करून मनुष्यांवरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्याच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे.

(टीप- सदर लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आलेला आहे. या लेखातील मतांचे लेटेस्टली कोणत्याही प्रकारचे समर्थन करत नाही.)