Shravan Somvar 2019 Wishes: श्रावणी सोमवार निमित्त खास मराठमोळी ग्रिटींग्स, SMS, Wishes, Images, Whatsapp आणि Facebook Status च्या माध्यमातून शेअर करुन शिवभक्तांचा सोमवार करा अधिक मंगलमय!
तुम्ही ही शुभेच्छापत्रं, संदेश Whatsapp आणि Facebook Status च्या माध्यमातून शेअर करुन शिवभक्तांचा सोमवार अधिक मंगलमय करुया.
Shravani Somvar 2019 Marathi Wishes & Messages: हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात सणवार, व्रतवैकल्य यांची रेलचेल पाहायला मिळते. विविध सणावारांनी नटलेल्या या महिन्यात श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व असते. शिव महिमेचा या काळात अनेक शिवभक्त मंदिरात जावून भगवान शंकराची दूध, फुले, शिवामुठ वाहून मनोभावे पूजा करतात. श्रावणी सोमवारी सवाष्ण स्त्रियांची तर शिवमंदिरात गर्दी दाटून येते.
श्रावणी सोमवार निमित्त देशातील अनेक लहान मोठी शिवमंदीरे सजतात. सगळीकडे श्रावणी सोमवारचा उत्साह असतो. त्याचबरोबर अनेक शिवभक्त या दिवशी उपवास करतात.
तुमच्या आमच्यातील याच शिवभक्तांना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रिटींग्स, SMS, Wishes, Images. तुम्ही ही शुभेच्छापत्रं, संदेश Whatsapp आणि Facebook Status च्या माध्यमातून शेअर करुन शिवभक्तांचा सोमवार अधिक मंगलमय करुया.
बेलाचे पान
वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव
माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना
शिव शंभो शंकराला
श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!
शंभो महादेवाची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच
महादेवा चरणी प्रार्थना!
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
शिव सत्य आहे.
शिव सुंदर आहे.
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे.
श्रावणी सोमवारच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
ॐ नमः शिवाय
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
हर हर महादेव
श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा!
श्रावणी सोमवार निमित्त अनेक शिवभक्त अगदी आपणही मंदिरात जावून दूध, फुले, शिवामुठीच्या रुपाने धान्य भगवान शंकराला अर्पण करत असलो तरी त्यामुळे दूध आणि धान्य वाया जाते. तसेच मंदिरं अस्वच्छ होतात. धान्य, दूध वाया जावू नये तसंच आपली श्रद्धास्थान असलेली मंदिरं स्वच्छ राहावी, म्हणून खूप धान्य व दूध शिवलिंगावर न वाहता प्रतिकात्मक म्हणून चमचाभर दूध, थोडेसं धान्य शिवलिंगावर वाहावे. कारण या सगळ्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होत नाहीत. तर तुमच्या मनातील भक्तीवर देवाची कृपा अवलंबून आहे. 'देव भक्तीचा भुकेला' असे म्हटलेच आहे. त्यामुळे यंदाच्या श्रावणी सोमवारपासून असा वेगळा विचार करायला काहीच हरकत नाही.