Shravan Somvar Vrat 2026 Dates: 13 ऑगस्ट पासून श्रावणमासारंभ; पहा श्रावणी सोमवार व्रत तारखा

महाराष्ट्रात पहिला श्रावण सोमवार १७ ऑगस्ट २०२६ आहे. त्यानंतर पुढील सोमवार २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर २०२६ या चार दिवशी श्रावणी सोमवारचं व्रत पाळलं जाणार आहे. पहा या दिवसाच्या शिवमूठा काय असतील?

Shravani Somvar Vrat

श्रावण (Shravan)  हा हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आणि भक्तिमय महिना आहे.  मराठी कॅलेंडर या पाचव्या महिन्यात सणवार, व्रत वैकल्यांची रेलचेल असते. श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना विशेष भावाने केली जाते आणि प्रत्येक सोमवारी उपवास ठेवून महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात अमांत पंचांग पद्धती पाळली जात असल्यामुळे उत्तर भारतापेक्षा येथे श्रावण महिना आणि श्रावणी सोमवार वेगळ्या तारखांना येतात. दरम्यान श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एक विशिष्ठ शिवमूठ अर्पण करण्याची देखील प्रथा आहे.

महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात कधी? 

महाराष्ट्रात यंदा  श्रावण मास १३ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होणार आहे. 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान हा श्रावण मास पाळला जाईल. नक्की वाचा: Shravan Masarambh 2026: यंदा श्रावण महिन्याची सुरूवात कधी? जाणून घ्या श्रावणी सोमवार, मंगळागौर सह महत्त्वाच्या सणाच्या तारखा.

श्रावण सोमवारच्या तारखा आणि शिवमूठ 

महाराष्ट्रात, म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम भारतात, पहिला श्रावण सोमवार १७ ऑगस्ट २०२६ रोजी येणार आहे. त्यानंतर पुढील सोमवार २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर २०२६ या चार दिवशी श्रावणी सोमवारचं व्रत पाळलं जाणार आहे.

17 ऑगस्ट 2026 - तांदूळ

24 ऑगस्ट 2026 - तीळ

31 ऑगस्ट 2026 - मूग

7 सप्टेंबर 2026 - गहू

श्रावण सोमवारचे महत्त्व

श्रावण सोमवारी उपवास ठेवून शिवशंकराची पूजा केल्याने मानसिक शांती आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून शिवमंदिरात जाऊन बेलपत्र, धोत्रा आणि पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे. अनेक भाविक निर्जळी किंवा फलाहार उपवास करतात आणि दिवसभर सात्विक आहाराचे पालन करतात.

पूजाविधी कशी करावी

सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र अर्पण करावे. "ॐ नमः शिवाय" या मंत्राचा जप केल्याने मन प्रसन्न राहते. संध्याकाळी आरती करून उपवास सोडावा.

श्रावण महिना हा भक्ती, संयम आणि श्रद्धेचा काळ आहे. महाराष्ट्रातील भाविकांनी १७ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या पवित्र सोमवारांचे व्रत मनोभावे पाळून महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करावा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement