हिंदु पंचागांनुसार आजपासून (9 ऑगस्ट 2021) पासून श्रावणमास सुरु होत आहे. 9 ऑगस्टपासून सुरु झालेला हा श्रावणमास 6 सप्टेंबर 2021 या दिवशी संपेल. या महिन्यात उपवास, वृत वैकल्ये, पाळले जाते. अनेक लोक मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करतात. सर्वत्र पावसाचे वातावरण असते. अनेक लेखक, कवी आदी मंडळींनाही या महिन्याचे भारी आकर्षण असते. त्यामुळेच कदाचित अनेक कथा, कविता, कादंबऱ्या आणि नाटकांमधूनही श्रावणाचे अत्यंत कल्पनारम्यतेने वर्णण केले जाते. या महिन्यातील श्रावणी सोमवार Shravan Somvar 2021) हे प्रमुख वृत मानले जाते. शिवपूजनासाठीही श्रावण महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने केलेले संकल्प तडीस जातात असे म्हणतात. मात्र, या दाव्याची कुठेही वास्तवदर्शी पुष्ठी केलेली फारशी पाहायला मिळत नाही. अशा या श्रावण सोमवार निमित्त जर आपणांस आपल्या आप्तेष्ठांना SMS, Images, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून शुभेच्छ्या द्यायच्या असतील. तर त्यासाठी एचडी इमेज (Shravan Somvar 2021 HD Images) इथे देत आहोत.
श्रावण महिन्यात काही लोक संपूर्ण महिनाभर उपवास करतात तर काही लोक आठवड्यातील एखाद्याच दिवशी उपवास करतात. काही लोक संपूर्ण महिनाभर मांसाहार पूर्णपणे टाळतात. अशीही एक अख्याईका सांगितली जाते की, भगवान शंकराला खुश करण्यासठी सोमवारच्या दिवशी उपवास करतात. अनेकदा अविवाहीत मुली श्रावणी सोमवारी उपवास करतात. या महिन्यात मंदिरांतून हर हर महादेवचा जयघोष कानावर पडताना आढळलतो.
श्रावण सोमवार शुभेच्छा!
श्रावण सोमवार शुभेच्छा!
श्रावण सोमवार शुभेच्छा!
श्रावण सोमवार शुभेच्छा!
श्रावण सोमवार शुभेच्छा!
श्रावण महिन्यात शिव पार्वतीचे पूजन केले जाते. हिंदू धर्म आणि पुरानात या पूजेचे महत्त्व सांगण्यात आल्यासे बोलले जाते. या महिन्या या पूजेला महत्त्व असण्याचे कारण असेही सांगितले जाते की, हा महिना शंकराच्य उपासनेचा आहे. यंदा श्रावण महिन्यातील पहिला सोमवार 9 ऑगस्ट 2021, दुसरा सोमवार 16 ऑगस्ट 2021, तिसरा सोमवार 23 ऑगस्ट 2021 तर चौथा आणि चौथा श्रावणी सोमवार 30 ऑगस्ट 2021 तर पाचवा आणि शेवटचा सोमवार 6 सप्टेंबर 2021 या दिवश आहे.