Shravan Month 2021 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 9 ऑगस्ट पासून; श्रावणी सोमवार ते पोळा जाणून घ्या या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या तारखा

महाराष्ट्रात आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याला (Shravan Maas) सुरूवात त्यामुळे यंदा त्याची सुरूवात 9 ऑगस्ट पासून होणार आहे.

Shravan Images | File Images

महाराष्ट्रामध्ये आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची (Shravan Month) सुरूवात होते. यंदा राज्यात 9 ऑगस्ट 2021 पासून श्रावण महिन्याला (Shravan Maas) सुरूवात होत आहे. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना हा पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात सण, व्रत समारंभांची रेलचेल असल्याने एकूण सारीकडे उत्साहाचे, जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण असते. या महिन्यात नागपंचमी (Nagpanchami) हा पहिला सण असतो तर बैलपोळा (Bailpola) हा शेवटचा.  श्रावण हा एक पवित्र महिना असल्याने अनेकजण या महिन्यात मांसाहार टाळतात. यामागे जशी धार्मिक आस्था आहे तशीच काही वैज्ञानिक कारणं देखील आहेत. त्यामुळे आषाढी अमावस्या ही गटारी अमावस्या म्हणून साजरी करत या दिवशी मांसाहारावर ताव मारला जातो आणि पुढे महिनाभर मांसाहार, मद्यसेवन टाळले जाते. मग निसर्गाप्रमाणे आपल्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करणार्‍या श्रावण महिन्यात यंदा कोणते सण, व्रत-समारंभ कधी आहेत? हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर ही यादी एकदा नक्की पहा.

श्रावणी सोमवार 2021

यंदा श्रावण महिन्याची सुरूवात मुळीच श्रावणी सोमवाराने होणार आहे. 9 ऑगस्ट हा सोमवार असल्याने या दिवशी पहिला श्रावणी सोमवार आहे. हिंदू धर्मिय या दिवशी शंकराची पूजा करून त्याला बेल आणि शिवमूठ अर्पण करतात.

पहिला श्रावणी सोमवार - 9 ऑगस्ट

दुसरा श्रावणी सोमवार - 16 ऑगस्ट

तिसरा श्रावणी सोमवार - 23 ऑगस्ट

चौथा श्रावणी सोमवार - 30 ऑगस्ट

पाचवा श्रावणी सोमवार - 6 सप्टेंबर

मंगळागौरी पूजन 2021

नववधूंसाठी मंगळागौरीचा सण मोठा आनंदाचा असतो. यंदा 10,17,24,31 ऑगस्ट दिवशी मंगळागौरी पूजन करून खेळ खेळले जाणार आहेत. नक्की वाचा:  Mangalagauri Vrat 2021 Dates: मंगळागौर पूजा यंदा कधी? जाणून घ्या तारखा आणि पूजा विधी.

जरा-जिवंतिका पूजन 2021

दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन करण्याची प्रथा आहे. हे यंदा 13,20,27 ऑगस्ट दिवशी होणार आहे.

दरम्यान श्रावण महिन्याची सुरूवात झाली की पहिला सण नागपंचमीचा असतो तो यंदा 13 ऑगस्टला आहे. त्यानंतर 22 ऑगस्टला रक्षा बंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल.30 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती आणि 31ऑगस्टला गोपाळकाला आहे. तर श्रावण महिन्याची सांगता 6 सप्टेंबरला बैलपोळ्याने होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif