Shivrajyabhishek Din 2022 HD Images: शिवराज्याभिषेक दिन साजरा करा WhatsApp Stickers, Quotes, Messages, Wallpapers आणि Greetings च्या माध्यमातून डिजिटल रुपात

Shivrajyabhishek Din 2022 निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही येथे WhatsApp Stickers, Quotes, Messages, Wallpapers आणि Greetings देत आहोत जे आपण HD Images रुपात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आदींवर शेअर करु शकता.

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)  हे प्रत्येक मराठी मनाचा आणि अस्मितेचा अभिमान आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी केवळ मुठभर मावळ्यांच्या जीवावर स्वराज्याची जी मुहूर्तमेढ रोवली ती त्यांना पुढे जनतेचा राजा छत्रपती करुन गेली. आपल्या राज्याच्या उभारणीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय, व्यवस्थापण, चातूर्य, शौर्य आणि जातधर्मविरहीत मानवतावादी दृष्टीकोन ही आजच्या पिढीला मिळालेली देणगी आहे. अशा या पराक्रमी राजाचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी पार पडला. जो आज शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek Din 2022) सोहळा म्हणून साजरा केला जातो. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभरात आणि जगभरातही विविध उपक्रम, कार्यक्रम, मोहिमा राबवल्या जातात. आजचे यूग हे डिजिटल यूग आहे. त्यामुळे  सहाजिकच सोशल मीडियावर एकमेकांना डिजिटल रुपातही शुभेच्छा दिल्याजातात. त्यामुळे Shivrajyabhishek Din 2022 निमित्त  शुभेच्छा देण्यासाठी आम्ही येथे WhatsApp Stickers, Quotes, Messages, Wallpapers आणि Greetings देत आहोत जे आपण HD Images रुपात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आदींवर शेअर करु शकता.

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक जरी 6 जून 1674 रोजी पार पडला असला तरी तो एका दिवसात पार पडला नाही. त्यासाठी आगोदरचे अनेक दिवस पूर्वतयारी सुरु होती. शिवराज्याभिषेकावेळी खरी अडचण अशी होती की, या आधी अशा प्रकारचा राज्याभिषेक झाला नव्हता. त्यामुळे तो कसा करावा याची काहीच पूर्वपरंपरा नव्हीत असे अभ्यासक सांगतात. त्यामुळे त्या वेळी छत्रपतींच्या दरबारात असलेल्या अनेक विद्वानांनी शास्त्र आणि परंपरांचा प्रदीर्घ अभ्यास केला. त्यासाठी विविध चालीरिती, परंपरा, धर्मशास्त्र, पुराण यांचाही अभ्यास करण्यात आला. त्या काळातील साम्राज्यातील विविध ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले. इतिहासात दाखला मिळतो की, राज्याभिषेकासाठी रायगडावर सुमारे लाखभर लोक जमले होते.यात विविध सरदार, प्रतिष्ठीत लोकांसोबतच, सामान्य नागरिकांचाही समावेश होता. याशिवाय देशी-विदेशी अभ्यासक, व्यापारी, विविध राजांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांचाही समावेश होता. (हेही वाचा,Shiv Rajyabhishek Din 2022 Wishes In Marathi: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा Quotes, WhatsApp Status द्वारा देत शिवप्रेंमीचा दिवस करा खास! )

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

 

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

 

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

 

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

 

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

 

शिवराज्याभिषेक दिन 2022 । File Photo

नियोजीत कार्यक्रमानुसार शिवाजी महाराज यांनी सर्व विधी यथासांग पार पाडले. आपल्या मातोश्री जिजाबाईंचाही आशीर्वाद घेतला. विविध मंदिरात जाऊन देवदर्शनही केले. विधीवत पूजा करुन ते 12 मे 1674 रोजी रायगडला परतले. या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांना भवानीमातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी प्रतापकडावर प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमातेचे दर्शन घेतले. या राज्याभिषेकासाठी गागा भट्ट या काशीच्या भटास खास आमंत्रित केले होते. या भट्टाला 7000 होन आणि त्यांच्यासोबतच्या इतर भटांना 17000 होन दक्षिणा देण्यात आली. या वेळी राजांनी भवानी मातेस सव्वा मन सोन्याची छत्री अर्पण केली. नंतर गागा भटाने विविध मंत्रोच्चारात महाराजांचा राज्याभिषेक केला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now