Mother's Day 2019: जिजाऊ ते सिंधुताई सकपाळ या '5' भारतीय महिला आहेत आदर्श माता

यंदा 12 मे दिवशी साजरा करण्यात येणार्‍या मातृदिनाच्या (Mothers Day) दिवशी जाणून घ्या पुढे अनेक पिढ्यांना प्रेरणा ठरणार्‍या काही आदर्श मातां विषयी

Indian Mothers | (Archived, edited, representative images)

Role Model Indian Mothers: 'घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी' हा नियम प्राणी, पक्षां नसतो. कळत नकळत प्रत्येक आई कितीही तिच्या कामामध्ये व्यग्र असली तरीही तिचं तिच्या मुलांकडे लक्ष असतेच. विविधतेने नटलेल्या भारतामध्ये सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय इतिहासही तितकाच दैपिप्यमान आहे. कला, राजकारण, शिक्षण, समाजकारण यामध्ये काही व्यक्तींनी आपलं अढळ स्थान बनवलं कारण त्यांना घडवणार्‍या माता तितक्याच संयमी आणि धडाडी होत्या. यंदा 12 मे दिवशी साजरा करण्यात येणार्‍या मातृदिनाच्या (Mothers Day) दिवशी जाणून घ्या पुढे अनेक पिढ्यांना प्रेरणा ठरणार्‍या काही आदर्श मातां विषयी Mother’s Day 2019 Gift Ideas: मदर्स डे निमित्त आईला सरप्राईज देण्यासाठी '5' बजेट फ्रेंडली आणि हटके गिफ्ट आयडियाज!

 1. जिजाबाई

छत्रपती शिवाजी महाराज यांची आई जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता. जिजाऊ लहानपणापासूनच शिवरायांना शौर्यकथा वाचून दाखवत असतं. अनेक शस्त्रांची ओळख दिली. समान न्याय करून देण्यास शिकवलं. अन्याय मोडून काढत स्वतः प्रसंगी राज्यकारभार सांभाळला.

2. राणी लक्ष्मीबाई

इंग्रजांविरूद्ध लढा देणारी राणी लक्ष्मीबाई रणांगणावर चिमुकल्या बाळाला घेऊन लढली. त्या लहानपणापासूनच धोरणी, चतूर, युद्धशास्त्रनिपुण होत्या.

3. सिंधुताई सकपाळ

अनाथांची माय अशी सिंधुताईंची ओळख आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंगाचा सामना करून देखील त्यांनी समाजातील अनाथांना आसरा देण्याचा पर्याय निवडला. मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना करून अनाथांसाठी त्यांनी आपल्या घराची दारं उघडली आहेत. आईचं निस्वार्थी प्रेम याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंधुताई सकपाळ आहेत.

4. इंदिरा गांधी

भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी अनेकींसाठी प्रेरणास्थान आहेत.राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्या आयुष्यात त्यांचं महत्त्व खास होतं. देशाची धुरा सांभाळत त्यांनी आपल्या मुलांनाही घडवलं.चूल आणि मुल हे समीकरण मोडत त्यांनी महिलांना सक्षम बनायला भाग पाडलं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली.

5.किरण बेदी

IPS ऑफिसर किरण बेदी यांनी लग्न, मूल झालं की करियर संपतं हा विचार खोडून काढत अनेक महिलांसाठी समजात आदर्श ठेवला आहे. एक महिला आयपीएस ऑफिसर ते आता राज्यपाल पदाचा भार त्यांनी सांभाळला आहे. 'इच्छा तेथे मार्ग असतो' मग मुलींच्या करियरच्या स्वप्नाआड कोणती गोष्ट येऊ शकत नाही.

आदर्श होण्यासाठी आईला प्रत्येकवेळेस प्रकाशझोकात यायलाच पाहिजे असे नसते. प्रत्येक मुलांसाठी तिची आई सुपरमॉम असते. मग यंदा तुमच्या आईमधील सुपरमॉमला देखील एकदा थॅक्यू म्हणा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now