Shiv Jayanti Tithi 2021 Messages: शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेजेस, Wishes, Quotes शेअर करुन साजरा करा महाराजांचा जन्मदिन!
Shiv Jayanti Tithi 2021 Marathi Messages: हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार उद्या जयंती. खरंतर शिवजयंती साजरी करण्यामागे वाद आहेत. त्यामुळे शिवजयंती दोनदा साजरी केली जाते. एकदा तारखेनुसार, 19 फेब्रुवारी रोजी तर एकदा तिथीनुसार, फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती साजरी केली जाते. उद्या, बुधवार, 31 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाईल. शिवजयंती निमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोविड-19 संकाटाचे सावट असल्याने सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहनही सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.
परंतु, सध्याच्या डिजिटल युगात फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) यांसारख्या सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शुभेच्छापत्रं शेअर करुन शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास मराठी शुभेच्छा, Wishes, Messages, Quotes तुम्ही आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रियजनांसोबत शेअर करु शकता. (Shiv Jayanti 2021 Wishes in Marathi: शिवजयंतीच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा!)
शिव जयंती शुभेच्छा!
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेवरुन मायेने हात फिरवणारा
राजा छत्रपती होता
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा राजा
छत्रपती शिवाजी
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
भवानी मातेचा लेक तो,
स्वराज्याचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा बाप होता…
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, शौर्य, चातुर्य, बुद्धीमत्ता सर्वश्रुत आहे. शिवजयंती निमित्त त्यांचे थोर विचार, कर्तृत्व पुढील पीढीपर्यंत पोहचवूया आणि त्यांचे गुण अंगिकारण्याचा प्रयत्न करुया. शिवरायांना हीच खरी मानवंदना ठरेल.
Tags
Chhatrapati Shivaji Maharaj
Shiv Jayanti
Shiv Jayanti 2021
Shiv Jayanti 2021 Messages
Shiv Jayanti 2021 Messages In Marathi
Shiv Jayanti 2021 Wishes
Shiv Jayanti 2021 Wishes In Marathi
Shiv Jayanti Banner
Shiv Jayanti Messages
Shiv Jayanti Messages In Marathi
Shiv Jayanti Quotes
Shiv Jayanti Status
Shiv Jayanti Status in Marathi
Shiv Jayanti Tithi Nusar
Shiv Jayanti Tithi Nusar 2021
Shiv Jayanti Wishes
Shiv Jayanti Wishes In Marathi
Shivaji Jayanti
Shivaji Jayanti 2021
Shivaji Maharaj Images
Shivaji Maharaj Jayanti
Shivaji Maharaj Photo
शिवजयंती 2021
शिवजयंती 2021 शुभेच्छा
शिवजयंती उत्सव बॅनर
शिवजयंती ग्रीटिंग्स
शिवजयंती मराठी शुभेच्छा
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा
शिवजयंतीच्या शुभेच्छा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
शिवभक्त स्टेटस मराठी
शिवराय स्टेटस मराठी
शिवाजी महाराज
शिवाजी महाराज जयंती
सण आणि उत्सव