Agra Fort च्या ‘Diwan-e-Aam’ मध्ये यंदा पहिल्यांदाच साजरी होणार शिवजयंती

इतिहासकारांच्या मते 16 व्या शतकातील मराठा योद्ध्याने आग्रा येथील या किल्ल्यावर आपला पराक्रम दाखवला होता.

Shivaji Maharaj (Photo Credits: Wikimedia Commons)

19 फेब्रुवारी हा शिवजयंतीचा (Shiv Jayanti) दिवस! महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मदिनाचा राज्यभर सोहळा साजरा केला जातो. यंदा हा सोहळा आग्राच्या किल्ल्यावरही (Agra Fort) पहिल्यांदा साजरा होणार आहे. ऐतिहासिक आग्रा किल्ल्याच्या दीवाण ए आम (Diwan-e-Aam) मध्ये देखिल शिवजयंती साजरी होणार आहे. 19 फेब्रुवारीसाठी सध्या आग्रा किल्ला सज्ज होत आहे.

यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी होत आहे. त्यासाठी काही सामाजिक संस्थांकडून केंद्र सरकार कडे विनंती करण्यात आली आहे. या विनंतीला मंजुरी देत सरकारने आग्रा किल्ल्याच्या दीवाण ए आम वर शिवजयंती सोहळ्याला परवानगी दिली आहे. नक्की वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 Date: महान शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या .

Archaeological Survey of India कडून मात्र त्यासाठी मंजुरी नाकारण्यात आली होती. त्यानंतर या संस्था दिल्ली उच्च न्यायालयात गेल्या. 8 फेब्रुवारीला कोर्टाने ASI ला जर महाराष्ट्र सरकार या सोहळ्यासाठी सह प्रायोजक असणार असतील तर परवानगी द्यावी असं म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहले आणि ASI ला देखील महाराष्ट्र सरकार आग्रा किल्ल्यावर शिवजयंती सोहळ्यासाठी सामाजिक संस्थांसोबत उभी असेल असं आश्वासित केले.

इतिहासकारांच्या मते 16 व्या शतकातील मराठा योद्ध्याने आग्रा येथील या किल्ल्यावर आपला पराक्रम दाखवला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif