Shiv Jayanti 2022 Date: शिवजयंती तारखेनुसार कोणत्या दिवशी केली जाते साजरी?

महाराष्ट्र शासनाकडून 19 फेब्रुवारी दिवशी शिवनेरी किल्ल्यावर रीती-परंपरांनुसार शिवाजन्मोत्सव साजरा केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज (Photo Credits- Facebook)

महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थपना करणारे युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाते. दरम्यान महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार शिव जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. गेग्रेरियन कॅलेंडर नुसार 19 फेब्रुवारी दिवशी शिवजयंती साजरी करण्याची महाराष्ट्र शासनाची पद्धत आहे. ऐतिहासिक दस्ताऐवजांनुसार शिवाजी महाराजांचा जन्म दिवस (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) हा इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630 दिवशी झाला आहे. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार, शिवजन्म हा फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 दिवशी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह जगभरात पसरलेले शिवभक्त दरवर्षी इंग्रजी कॅलेंडरनुसार, 19 फेब्रुवारी हा दिवस शिव जयंती (Shiv Jayanti) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य सरकार कडून देखील 19 फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. हे देखील नक्की वाचा: Shiv Jayanti 2022: शिवजयंती निमित्त जन्मोत्सव सोहळ्याला 500 तर शिवज्योत दौडीत 200 जणांच्या उपस्थितीला परवानगी.

महाराष्ट्रातील शिवजयंती सेलिब्रेशन

महाराष्ट्रामध्ये 1869 साली ज्योतिराव फुले यांनी रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे कार्य सामान्यांच्या घरात पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 साली पहिली शिवजयंती महाराष्ट्रात साजरी केली. हा शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता. तेव्हापासून शिव जयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. त्यानंतर देशात स्वातंत्र लढा उभारताना पुन्हा शिवजयंती अधोरेखित झाली. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्याचे काम सुरू केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली. शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे ते 2 वेळेस अध्यक्ष होते.

महाराष्ट्रात शिवजयंती निमित्त खास कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध स्पर्धा आयोजित करून शिवरायांच्या कामाला सलाम केला जातो. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा रितीनुसार साजरा करण्याची पद्धत आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकार कडून आयोजित केला जातो. त्यामध्ये सामान्य शिवप्रेमी देखील सहभागी होतात. या दिवशी पाळणा, पोवाडे गाऊन दिवसभर शिवजयंतीचं सेलिब्रेशन केले जाते.