IPL Auction 2025 Live

Shiv Jayanti 2020 Wishes: शिवजयंतीच्या शुभेच्छा देणार्‍या Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करुन साजरा करा यंदाचा शिवछत्रपतींचा जन्मोत्सव!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390व्या जयंती निमित्त आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिवभक्तांना, शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे संदेश, Wishes, Greetings, शुभेच्छापत्रं नक्की शेअर करा.

Shiv Jayanti 2020 Wishes (Photo Credits: File Image)

Shivaji Maharaj Jayanti 2020 Marathi Wishes: प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. यंदा शिवछत्रपतींच्या जयंतीचे हे 390वे वर्ष आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जनसोहळा म्हणजे महाराष्ट्रासाठी कोणत्या उत्सवातून कमी नसतो. या शिवजयंतीच्या निमित्ताने गल्ली पासून दिल्ली पर्यंत नव्हे तर जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम कथा विविध माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासोबतच यंदाच्या शिवजयंती निमित्ताने मराठमोळे मेसेजेस, शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्सच्या माध्यमातून शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शेअर करून हा सोहळा साजरा करा. महाराष्ट्र सरकारकडून 19 फेब्रुवारी दिवशी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. मग यंदा डिजिटल माध्यमातून शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्यासाठी ही खास मराठमोळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शेअर करून साजरा करा महाराजांचा जन्मोत्सव सोहळा.

महाराष्ट्रासाठी उत्सव असणाऱ्या शिवजयंती निमित्त आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्ठांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास मराठमोळे संदेश, Wishes, Greetings, शुभेच्छापत्रं. ही शुभेच्छपत्रं फेसबूक, व्हॉटसअ‍ॅप आणि मेसेजेसच्या माध्यमातून शेअर करुन शिवजयंतीचा आनंद द्विगुणीत करा. (शिवजयंती 19 फेब्रुवारी दिवशी साजरा करण्याचा इतिहास व महत्त्व काय?)

शिवजयंती 2020 शुभेच्छा 

शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,

शेकडो वर्षाची काळरात्र चिरुन स्वराज्याच्या

मंगल प्रकाशाने सगळा

आसमंत तेजोमय बनवणारा

शिवसुर्य...!!

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti 2020 Wishes (Photo Credits: File Image)

मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती

सारे माझा माझा

आजही गौरव गीते गाती

ओवाळूनी पंचारती

तो फक्त राजा शिवछत्रपती

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Shiv Jayanti 2020 Wishes (Photo Credits: File Image)

जगणारे ते मावळे होते

जगवणारा तो महाराष्ट्र होता

पण स्व:च्या कुटुंबाला विसरून

जनतेकडे मायेने हात फिरवणारा.

तो 'आपला शिवबा' होता

जय शिवराय!

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti 2020 Wishes (Photo Credits: File Image)

शिवराय मनामनात

शिवजयंती घराघरात...

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti 2020 Wishes (Photo Credits: File Image)

शूरता हा माझा आत्मा आहे!

विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!

छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!

शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Shiv Jayanti 2020 Wishes (Photo Credits: File Image)

पहा व्हिडिओ:

जोतीराव फुले यांनी 1870 सालापासून शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. शिवजयंतीचा सोहळा पुण्यात प्रथम पार पडल्यानंतर शिवजयंती हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी उत्सवच झाला. यंदाच्या शिवजयंती निमित्त पुन्हा एकदा महाराजांचा गौरव करत त्यांचे धैर्य, पराक्रम, साहस, निष्ठा या गुणांचा वारसा पुढील पिढीला देऊया.