Shivaji Jayanti 2019: वैशाख शुद्ध द्वितीया नुसार यंदा कधी साजरी होणार शिव जयंती?
यंदा परंपरेनुसार साजरी करण्यात येणारी शिव जयंती 6 मे 2019 दिवशी आहे.
Shiv Jayanti 2019 Tithi Based Date: महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Mahaarj) यांच्या जन्मतारखेवरून अनेक वाद आहेत. महाराष्ट्रात तारखेनुसार 19 फेब्रुवारी दिवशी शिवाजी महाराज जयंती साजरी करतात. तर मराठी पंचांगानुसार फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. पण संभाव्य तिथीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया (Vaishakh Shuddha Dwitiya) या दिवसाचाही उल्लेख असल्याने महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरदेखील शिवाजी महाराज जयंती परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीया या दिवशी साजरी केली जाते. यंदा परंपरेनुसार साजरी करण्यात येणारी शिव जयंती 6 मे 2019 दिवशी आहे. Shiv Jayanti 2019: शिवजयंती शुभेच्छा देणारी खास मराठमोळी व्हॉट्सअॅप स्टिकर्स
वैशाख शुद्ध द्वितीया दिवशी शिवजन्माचे उल्लेख कुठे आढळतात?
इतिहासाचार्य राजवाडे ते ग.भा. मेहेंदळे यांच्यापर्यंत अनेक इतिहासकारांनी अनेक बखरींमध्ये शिवजन्म हा वैशाख महिन्यातील असल्याचा दावा केला आहे. 1923 साली ‘फोर्ब्स’ या इंग्रजी अभ्यासकाने संकलित केलेल्या साधनांचा संग्रह प्रसिद्ध केला त्यामध्ये एका बाडात फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या तारखेचा उल्लेख आढळतो.
जुनी शिवजन्मतिथी आणि जेधे शकावलीमध्ये असलेली फाल्गुन वद्य तृतीया 1551 (19 फेब्रुवारी 1630) ही जन्मतिथी यापैकी नेमकी खरी शिवजयंती कोणती हा वाद अनेक वर्षांपासून रंगला आहे. मात्र 2000 साली महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी हा दिवस शिवजयंती म्हणून जाहीर करून त्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. (नक्की वाचा : Shivaji Maharaj Jayanti 2019: छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण तुम्ही पुढील पीढीला द्याल?)
शिवजयंतीच्या तारखेवरून वाद असला तरीही समजातील जो घटक ज्या दिवशी शिवजयंती साजरा करतो त्या दिवशी छत्रपती महाराजांच्या शौर्याचे पोवाडे, कथा यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. शिवाजी महाराजांची महती पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जातात.