National Unity Day 2022 Messages: राष्ट्रीय एकता दिनानिमित्त Wishes, Quotes, SMS, Facebook Images द्वारा शेअर करा खास शुभेच्छा!

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त Wishes, Quotes, SMS, Facebook Images द्वारा तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता.

National Unity Day 2022 Messages (PC - File Image)

National Unity Day 2022 Messages: देश 31 ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147 वी जयंती साजरी करणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. 2014 मध्ये प्रथमच राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते. मोदी सरकार पुन्हा एकदा सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्सवात साजरी करण्याची तयारी करत आहे.

सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः गुजरातमधील केवडिया येथे जातील आणि तेथे आयोजित एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करतील. केवडियातच स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. भारतीय नागरी सेवेतील सातत्य राखण्यात सरदार पटेल हे निर्णायक व्यक्तिमत्त्व होते. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त Wishes, Quotes, SMS, Facebook Images द्वारा तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता.

भिन्न भाषा, भिन्न वेशभूषा,

असा एक भारत हा आपला देश आहे

राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

National Unity Day 2022 Messages (PC - File Image)

आपली एकता हीच आपली ओळख,

म्हणूनच आपला देश महान आहे..

राष्ट्रीय एकता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

National Unity Day 2022 Messages (PC - File Image)

हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई

हम सब हैं भाई-भाई

राष्ट्रीय एकता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

National Unity Day 2022 Messages (PC - File Image)

न्याय, स्वातंत्र्य आणि एकता

हीच भारताची ताकद आहे

राष्ट्रीय एकता दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

National Unity Day 2022 Messages (PC - File Image)

एकता हा देशाच्या विकासाचा,

सौंदर्याचा आणि उद्धाराचा मूळ मंत्र आहे.

राष्ट्रीय एकता दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

National Unity Day 2022 Messages (PC - File Image)

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दिवस साजरा केला जातो. त्यांनी स्वातंत्र्यानंतर भारतातील 563 संस्थानांचे विलीनीकरण करण्यासाठी ज्या प्रकारे काम केले आणि भारताची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या अखंड कार्यामुळे त्यांना भारताचे लोहपुरुष म्हटले जाते.