Buddha Purnima 2023 Quotes: बुद्ध पौर्णिमेनिमित्त सोशल मीडियाद्वारे शेअर करा गौतम बुद्धांचे 'हे' खास विचार

बुद्ध पौर्णिमेनिमित्त WhatsApp Messages, Images द्वारा तुम्ही भगवान गौतम बुद्धांचे विचार आपल्या मित्र-परिवारास शेअर करू शकता.

Buddha Purnima Quotes (PC - File Image)

Buddha Purnima 2023 Quotes: उद्या म्हणजेच 05 मे 2023 वैशाख पौर्णिमा आहे. सनातन धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान गौतम बुद्धांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता.

दरवर्षी वैशाख पौर्णिमेच्या तारखेला भगवान बुद्धांची जयंती आणि निर्वाण दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जगभरातून बौद्ध धर्माचे अनुयायी बोधगया येथे येतात आणि बोधिवृक्षाची पूजा करतात. भगवान गौतम बुद्धांना या दिवशी बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त WhatsApp Messages, Images द्वारा तुम्ही भगवान गौतम बुद्धांचे विचार आपल्या मित्र-परिवारास शेअर करू शकता. (हेही वाचा -Buddha Purnima Quotes in Marathi: बुद्ध पौर्णिमानिमित्त गौतम बुद्ध यांचे 'हे' सकारात्मक विचार WhatsApp Messages, Images द्वारा शेअर करून साजरा करा खास दिवस!)

तीन वस्तू जास्त वेळ लपू शकत नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य...

Buddha Purnima Quotes (PC - File Image)

चिडलेल्या विचारातून जो मुक्त राहतो, त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते.

Buddha Purnima Quotes (PC - File Image)

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात.

Buddha Purnima Quotes (PC - File Image)

 

ख-या अर्थाने स्वत:वर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही

Buddha Purnima Quotes (PC - File Image)

लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे

Buddha Purnima Quotes (PC - File Image)

द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही. तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो.

Buddha Purnima Quotes (PC - File Image)

यावर्षी बुद्ध पौर्णिमेला अनेक योगायोग घडत आहेत. 05 मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या तारखेला बुद्ध जयंती साजरी केली जाईल, तसेच वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील याच दिवशी होईल. ज्योतिषीय गणनेच्या आधारे 130 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. याशिवाय अनेक ग्रह-नक्षत्रांचा दुर्मिळ संयोगही या संयोगाने पाहायला मिळणार आहे.