Shab-e-Barat Mubarak Images: शब-ए-बारात च्या शुभेच्छा Wishes, Messages, Wallpapers च्या माध्यमातून शेअर करून साजरी करा Mid-Sha’ban!
मग आजच्या या खास दिवसांच्या तुमच्या मित्र परिवारला शुभेच्छा देण्यासाठी खास ग़्रीटींग्स, शुभेच्छापत्र!
Shab-e-Barat 2020 Wishes and Images: मुस्लिम बांधवांसाठी शब-ए-बारात (Shab e Barat) ही शबान महिन्यातील महत्त्वाची रात्र असते. यंदा हा सण ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 8 एप्रिलच्या रात्रीपासून 9 एप्रिलच्या सूर्यास्तापर्यंत साजरा केला जाणार आहे. शब-ए-बारातच्या रात्री मुस्लिम बांधव आपल्या चुकांची कबुली देऊन आगामी वर्षासाठी सुख, शांती, समृद्धीची कामना करतात. मग आजच्या या दिवशी तुमच्या मुस्लीम बांधवांना, मित्र परिवाराला शब-ए-बारात मुबारक (Shab-e-Barat Mubarak) म्हणत खास शुभेच्छा, ग्रीटिंग्स (Greetings) , एसएमएस (SMS), मेसेज (Messages), HD Images देऊन त्यांचा आजचा दिवस खास बनवा. Shab-E-Barat 2020 Messages: 'शब-ए-बारात' च्या निमित्ताने Wishes, HD Images, Greetings, Wallpapers, शेअर करुन मुस्लिम बांधवाना द्या शुभेच्छा!
'शब' म्हणजे रात्र आणि 'बरात' एक अरबी नाव आहे ज्याचा अर्थ निरपराधीपणा असा होतो. शब-ए-बारातच्या रात्री जागून अल्लाह कडे प्रार्थना केली जाते. कुराणाचे पठण केले जाते. तसेच कब्रस्तानला भेट देऊन पूर्वजांच्या स्मृतिस्थळावर फूल वाहून आदरांजली व्यक्त केली जाते. अल्लाहची प्रार्थना करताना मृत्यूनंतर ‘जन्नत’ प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना केली जाते. चूकांची कबुली देऊन त्यातून मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते.
शब-ए-बारात मुबारक
यंदा जगासोबतच भारतामध्येही कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. सध्या कोव्हिड 19 या जागतिक आरोग्य संकटाला रोखण्यासाठी भारतासह सध्या जगाच्या विविध भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. अशावेळेस प्रार्थनास्थळांमध्ये न जाता घरच्या घरी नमाज अदा करण्याचं आवाहन भारत सरकारकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा शब-ए-बारात चा सण यंदा घरच्याघरीच जवळच्या व्यक्तींसोबत साजरा करा आणि अखंड मानवजातीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करा.