Sex Tips: सेक्स केल्यानंतर कशी कराल प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता? STD आणि UTI पासून बचाव करण्यासाठी शारिरीक संबंध ठेवल्यानंतर 'या' पद्धतीने घ्या खासगी अवयवांची काळजी

सेक्स करणे हे कपल्ससाठी जसे सुखकारक आणि आनंदाचा क्षण असतो त्याच प्रमाणे Sexual Hygiene कडे सुद्धा लक्ष देणे फार महत्वाचे आहे. सेक्स नंतर जर प्रायव्हेट पार्ट योग्य रितीने स्वच्छ न केल्यास व्यक्तीला Sexually Transmitted Diseases होण्याचा धोका अधिक वाढतो.

प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: The Noun Project and File)

How to Clean up After Sex: सेक्स करणे हे कपल्ससाठी जसे सुखकारक आणि आनंदाचा क्षण असतो त्याच प्रमाणे Sexual Hygiene कडे सुद्धा लक्ष देणे फार महत्वाचे आहे. सेक्स नंतर जर प्रायव्हेट पार्ट योग्य रितीने स्वच्छ न केल्यास व्यक्तीला Sexually Transmitted Diseases होण्याचा धोका अधिक वाढतो. याच कारणास्तव सेक्शुअल हायजिन हे Healthy Sex Life साठी फार गरजेचे आहे. काही कपल्स सेक्स केल्यानंतर त्यांचे प्रायव्हेट पार्ट साफ करण्याऐवजी झोपून जातात. तसेच सेक्शुअल हायजिनला सुद्धा महत्व देत नाहीत. परंतु असे केल्यास आरोग्य नव्हे तर सेक्स लाईफसाठी ते धोकादायक ठरु शकते. सेक्शुअल लाईफमध्ये हायजिनला ऐवढे का महत्व दिले जाते आणि त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो का? या संबंधित सविस्तर येथे जाणून घ्या.

सेक्शुअल हायजिन का गरजेचे आहे?

यौन स्वच्छता का महत्वपूर्ण आहे? या प्रश्नाचे अगदी सहज आणि अपेक्षित उत्तर म्हणजे एसटीडी पासून बचाव करणे होय. जर तुमच्या प्रायव्हेट पार्टममध्ये दीर्घ काळापासून बॅक्टेरिया असल्यास तुम्हाला STD चा धोका संभवू शकतो. याच कारणास्तव नेहमीच लक्षात ठेवा की, सेक्स केल्यानंतर प्रायव्हेट पार्टची स्वच्छता जरुर करण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त तुम्हाला उत्तम झोप हवी असल्यास हे काम जरुर करा.

सेक्स केल्यानंतर कशी कराल स्वच्छता?

सेक्स केल्यानंतर यौन स्वच्छता करण्यासाठी अंघोळ करणे हा उत्तम पर्याय मानला जातो. दरम्यान, सेक्स नंतर थकवा जाणवणे स्वाभाविकच आहे. परंतु सेक्शु्अल हायजिन सुद्धा नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही अंघोळ करु शकता.(Sex Positions Guides: जगभरातील कपल्स मध्ये फेमस आहेत या 5 टॉप सेक्स पोझिशन्स, तुम्हीही करु शकता ट्राय)

वजाइना

सेक्स नंतर मलमूत्र विसर्जन करणे ही सर्वात समाधानकारक क्रिया मानली जाते. अभ्यासातून असे समोर आले आहे की, सेक्स केल्यानंतर मलमूत्र विसर्जन केल्यास वजाइना आतमधून सुद्धा स्वच्छ होतो. यामुळे एसटीडी किंवा अन्य यूटीआय होण्याचा धोका संभवत नाही.

पेनिस

नेहमीच तुम्ही सेक्स केल्यानंतर पेनिसची स्वच्छता करण्यासाठी एक सेक्स टॉवेल तुमच्याजवळ ठेवा. जर तुम्हाला सेक्सनंतर आराम करायचा असल्यास या टॉवेलचा आधार घेऊ शकता. त्यामुळे प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठी अंघोळ करण्यापूर्वी बेडवर टॉवेलच्या सहाय्याने आराम करु शकता.

नोट- वरील दिलेली माहिती ही फक्त सुचनात्मक उद्देशाने लिहिली आहे. याची वास्तविकता आणि विशिष्ट परिणांमांची आम्ही कोणतीही पुष्टी करत नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement