Dhamma Chakra Pravartan Din 2024 Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त Wishes, Images, SMS, WhatsApp Status द्वारे बौद्ध बांधवांना पाठवा खास ग्रीटिंग्ज
तुम्ही देखील खालील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ईमेज, मेसेज, व्हॉट्सअॅप मेसेज द्वारे आपल्या बौद्ध मित्र-मैत्रिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
Dhamma Chakra Pravartan Din 2024 Messages: 'धम्म चक्र प्रवर्तन दिन 2024' (Dhamma Chakra Pravartan Din 2024) दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी, त्यांनी आणि अंदाजे 600,000 अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला, ज्यामुळे हा दिवस बौद्ध समुदायामध्ये महत्त्वपूर्ण आणि आदरणीय बनला. तेव्हापासून हा दिवस बौद्ध समाजातील लोक मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरा करतात.
जातिव्यवस्था आणि वर्णभेद यासारखे भेदभाव भारतातील समाजात खोलवर रुजलेले आहेत. दुर्दैवाने आजच्या आधुनिकतेच्या युगातही भारतीय समाजात जातीनिहाय भेदभाव सुरूच आहे. देशाच्या अनेक भागात उच्च जातीचे लोक खालच्या जातीतील लोकांशी भेदभाव करतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याकाळी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. या दिवशी बौद्ध बांधव एकमेकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ईमेज, मेसेज, व्हॉट्सअॅप मेसेज द्वारे आपल्या बौद्ध मित्र-मैत्रिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य,
परिवर्तनाच्या दिशेने चालण्याचे घेऊन धैर्य;
एकमुखाने गात भीमरायाचे शौर्य,
सोबतीने पार पाडू धम्मप्रसार कार्य..!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज येतो गंध भिमाच्या दीक्षाभूमीच्या मातीला
या मातीने उद्धरिले साऱ्या मानवजातीला
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लावला
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला
14 ऑक्टोंबर 1956 जगातील सर्वात मोठे धर्मांतर
धम्मचक्र परिवर्तन दिनाबद्दल मंगलमय हार्दिक शुभेच्छा
समाजातील वंचित आणि शोषितांच्या
जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या
धम्मचक्र प्रवर्तन दिनी
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना विनम्र अभिवादन !
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
क्रांती घडवावी तर बाबासाहेबांसारखी
आणि शांती मिळवावी तर गौतम बुद्धांन सारखी
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध धर्माच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आंबेडकरांचे अनेक बौद्ध अनुयायी 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' साजरे करण्यासाठी नागपुरातील दीक्षाभूमी येथे जमतात, जिथे लोक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात.