Constitution Day 2023 Wishes In Marathi: भारतीय संविधान दिनानिमित्त Messages, Images, Quotes, SMS च्या माध्यमातून पाठवा खास शुभेच्छापत्र!
भारतीय संविधान दिनानिमित्त सोशल मीडीयावर मराठी इंग्रजी ग्रीटिंग्स, Wishes, Quotes, Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर तुम्ही हा दिवस अधिक खास करू शकता.
Constitution Day 2023 Wishes In Marathi: दरवर्षी 26 जानेवारीला संविधान दिन (Constitution Day 2023) साजरा केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. 26 नोव्हेंबर 2949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काही महिने लागले. यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची पूर्ण अंमलबजावणी झाली आणि हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून प्रत्येक भारतीयामध्ये संवैधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाची व्याख्या अमेरिकन इतिहासकार ग्रेनव्हिल सेवर्ड ऑस्टिन यांनी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज म्हणून केला होता. डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले आणि संविधानाच्या मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संविधान दिनानिमित्त सोशल मीडीयावर मराठी इंग्रजी ग्रीटिंग्स, Wishes, Quotes, Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर तुम्ही हा दिवस अधिक खास करू शकता.
उत्सव तीन रंगाचा
आज सजला!
नतमस्तक आम्ही त्या सर्वांना
ज्यांनी भारत देश घडविला!!
संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखणी तर सर्वांच्या हातात होती
ताकत तर सर्वांच्या मनगटात होती
पण राज्यघटना लिहण्याची क्षमता
फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होती
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिथे माणसा माणसात भेद आहे
त्या पुस्तकाचे नाव वेद आहे,
जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे
त्या व्यक्तीचे नाव संविधान आहे.
भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगातील सर्वश्रेष्ठ संविधान…!
हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून
श्रमिक-कष्टकरी-दलित पददलितांची सुटका
करणाऱ्या संविधानाचे रक्षण करू या…!
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
नको राजेशाही,
नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही.
भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
‘संविधान दिन’ हा सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी भारताने ब्रिटीश राजवट दूर करून खर्या अर्थाने पूर्ण स्वातंत्र्य साजरे केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळूनही, 26 जानेवारी 1950 रोजी देशाची स्वतःची राज्यघटना लागू होईपर्यंत भारत पुढील तीन वर्षे ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली राहिला. या दिवसाच्या निमित्त शासकीय, शैक्षणिक व न्यायिक संस्थांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.