April Fool Messages in Marathi: एप्रिल फुल निमित्त Funny Messages, SMS, Images पाठवून आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या हटके व मजेशीर शुभेच्छा!

तुम्ही ते सोशल मीडियावर आपल्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करून एकमेकांना एप्रिल फूलच्या शुभेच्छा देऊ शकता.

April Fool Messages in Marathi 6 (Photo Credit - File Image)

April Fool Messages in Marathi: एप्रिल फूल डे (April Fool) दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या तारखेला साजरा केला जातो. या दिवशी लहान मुले असो वा वृद्ध, प्रत्येकजण एकमेकांना फूल बनवण्याच्या खेळात उत्साहाने भाग घेतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फसवणूक झाल्यावरही कोणाला राग येत नाही, उलट तो स्वतः या खेळात सामील होतो. या दिवसाबद्दल तुम्ही अनेक किस्से ऐकले असतील.

एप्रिल फूल हा एक असा दिवस आहे, जेव्हा लोक मित्र आणि कुटुंबासह विनोद करतात. एकमेकांची चेष्टा करण्याव्यतिरिक्त, ते एकमेकांना विनोद पाठवतात आणि हा दिवस आनंदाने साजरा करतात. मित्राला किंवा कुटुंबातील व्यक्तीला या दिवशी फसवल्यानंतर ते त्यांना 'एप्रिल फूल' करत शुभेच्छा देतात. आम्ही तुमच्यासाठी असेच काही एप्रिल फूल जोक्स, मेसेस, व्हॉट्स अॅप स्टेटस घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियावर आपल्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करून एकमेकांना एप्रिल फूलच्या शुभेच्छा देऊ शकता.

मनात तू आहेस स्वप्नात तू आहेस, माझ्या जीवनात ही तू आहेस,

आज ज्या मुलीला एप्रिल फूल बनवलं, ती पण फक्त तूच आहेस

April Fool Messages in Marathi 1 (Photo Credit - File Image)

तू चार्मिंग आहेस, तू इंटेलिजंट आहेस

तू क्युट आहेस, आणि मी ?

मी अशा अफवा पसरविणारा!…Happy April Fool’s Day!

April Fool Messages in Marathi 2 (Photo Credit - File Image)

कोणतीही महत्त्वाची गोष्ट असेल तर मला उद्याच सांग, कारण कदाचित आज मला काहीच खरं वाटणार नाही…एप्रिल फूल!

April Fool Messages in Marathi 3 (Photo Credit - File Image)

तुला मी मेसेजमध्ये फूल पाठवले आहे

बघ ना

दिसले का?

नाही दिसले?

कसे दिसणार कारण हे आहे एप्रिल फूल

April Fool Messages in Marathi 4 (Photo Credit - File Image)

2 ऑक्टोबर - गांधीजींसाठी

14 नोव्हेंबर : नेहरूंसाठी

15 ऑगस्ट : देशासाठी

1 एप्रिल: फक्त तुझ्यासाठी, Enjoy Your Day !

Happy April Fool's Day!

April Fool Messages in Marathi 5 (Photo Credit - File Image)

19व्या शतकात ब्रिटीशांनी भारतात एप्रिल फूल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत तो साजरा करण्याची क्रेझ वाढली आहे. सोशल मीडियावरही यासंबंधीचे मीम्स आणि जोक्स व्हायरल होतात.



संबंधित बातम्या