Ganesh Visarjan 2024 Wishes in Marathi: गणपती विसर्जनानिमित्त Messages, Quotes, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून द्या लाडक्या बाप्पाला निरोप!

तुम्ही देखील दीड किंवा तीन दिवसांचा गणपती बसवत असाल तर आम्ही तुमच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी काही गणपती विसर्जन मेसेज, गणेश विसर्जन शुभेच्छा, गणेश विसर्जन संदेश, गणेश विसर्जन कोट्स, गणेश विसर्जन प्रतिमा, गणेश विसर्जन व्हॉट्सॲप स्टेटस, गणपती विसर्जन मराठी कोट्स घेऊन आलो आहोत.

Ganesh Visarjan 2024 Wishes 6 (Photo Credit - File Image)

Ganesh Visarjan 2024 Wishes in Marathi: गणेश चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते. देशभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. भाद्रपद या हिंदू महिन्यात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थीचा उत्सव दहा दिवसांपर्यंत असतो. या उत्सवाचा समारोप अनंत चतुर्थीने होतो. मात्र, अनेकजण 1, 3,5, 7 किंवा 10 दिवसाचा गणपती बसवतात.

त्यामुळे तुम्ही देखील दीड किंवा तीन दिवसांचा गणपती बसवत असाल तर आम्ही तुमच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी काही गणपती विसर्जन मेसेज, गणेश विसर्जन शुभेच्छा, गणेश विसर्जन संदेश, गणेश विसर्जन कोट्स, गणेश विसर्जन प्रतिमा, गणेश विसर्जन व्हॉट्सॲप स्टेटस, गणपती विसर्जन मराठी कोट्स घेऊन आलो आहोत. तुम्ही हे विसर्जन संदेश व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेऊन तुमच्या लाडक्या गणरायाला निरोप देऊ शकता.

वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया,

वरदहस्त असूद्या माथी,

राहू द्या सदैव तुमची छत्रछाया,

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

निरोप देतो देवा आज्ञा असावी,

चुकले आमचे काही देवा क्षमा असावी…

गणपती बाप्पा मोरया...

अडचणी खूप आहेत जीवनात,

पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद फक्त तुझ्यामुळे येते… निरोप घेताना एकच आर्शीवाद दे

या संकटातून सर्वांची सुखरूप सुटका होऊ दे…

डोळ्यात आले अश्रू,

बाप्पा आम्हाला नका विसरू,

आनंदमय करून चालला तुम्ही,

पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही….

गणपती बाप्पा मोरया...

आभाळ भरलं होतं तू येताना,

आता डोळे भरून आलेत तुला निरोप देताना…

गणपती बाप्पा मोरया...

गणेश विसर्जनाच्या दिवशी भक्त गणरायाच्या मातीच्या मूर्तींना पाण्यात विसर्जित करून निरोप देतात. महाराष्ट्रात गणेश विसर्जन सोहळा नेत्रदीप असतो. गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला अगदी वाजत गाजत निरोप देतात आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करतात.