Savitribai Phule Jayanti 2021 Images: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत अर्पण करा आदरांजली!

यानिमित्ताने मुलींना शिक्षण मिळणं किती महत्त्वाचं आहे याची विविध स्तरावर जनजागृती केली जाते.

Savitribai Phule Jayanti | Photo Credits: File Image

Savitribai Phule 190th Jayanti: आशिया खंडामध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची कवाडं खुली करणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची आज जयंती! सावित्रीबाईची ओळख महाराष्ट्राला समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची पत्नी अशी असली तरीही त्या कवियित्री, समाजसुधारक आणि भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म महाराष्ट्रात सातारा येथील नायगाव मध्ये झाला. कर्मठ समाजाला न जुमानता सावित्रीबाईंनी सुरूवातीला स्वतः शिक्षण घेऊन समाजातील स्त्रिया, मुलींना शिकण्यास प्रवृत्त केले. त्यांच्यासाठी विशेष शाळा सुरू केली. केवळ शिक्षण क्षेत्रामध्येच नव्हे तर समाजातील अनिष्ट रूढी- परंपरांना देखील छेद देत त्यांनी मोकळा श्वास घेण्यास मोलाची कामगिरी बजावली आहे. आज या क्रांतीज्योतीच्या 190 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी काही मराठी शुभेच्छापत्र, HD Images, Wallpapers, Photos व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. Mahila Shikshan Din: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरी होणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय.

महाराष्ट्रात राज्य सरकारने आता दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी हा दिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा त्याच पहिलंच वर्ष असणार आहे. मग या निमित्ताने या समाजसुधारकेला नक्की आपली आदरांजली अर्पण करा.

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन

Savitribai Phule Jayanti | Photo Credits: File Image
Savitribai Phule Jayanti | Photo Credits: File Image
Savitribai Phule Jayanti | Photo Credits: File Image
Savitribai Phule Jayanti | Photo Credits: File Image

सावित्री बाई फुले यांची जयंती बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरा केला जातो. यानिमित्ताने मुलींना शिक्षण मिळणं किती महत्त्वाचं आहे याची विविध स्तरावर जनजागृती केली जाते.

सावित्रीबाईंनी शिक्षणासोबतच सामाजिक कार्यामध्येही मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये दुष्काळ आणि प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी स्वतः मैदानात उतरून काम केले आहे. सोबतच पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न, ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची कामगिरी सांभाळणं, सती सारख्या प्रथांना देखील त्यांनी रोखलं होतं. पुढे 1897 च्या पुण्यातील प्रलयकारी प्लेगच्या साथीमध्ये त्यांचा मृत्यू झाला.