Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala 2022: संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळा निमित्त Quotes, WhatsApp Status द्वारा शेअर करा माऊलींचे विचार
सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. त्यांची रचना देखील ज्ञानेश्वर महाराजांची आहे.
महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा आहे. यामधील संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली (Sant Dnyaneshwar) यांचं योगदान आजही जगाला दिशादर्शक आहे. वयाच्या 21 व्या वर्षी समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळा हा कार्तिक वद्य त्रयोदशी दिवशी पाळला जातो. यंदा हा दिवस 22 नोव्हेंबर दिवशी आहे. यानिमित्त आळंदीला संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळ्याच्या (Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala) निमित्ताने खास कार्यक्रम असतात. मग या दिवशी तुम्ही देखील स्मरण करून त्यांच्या विचारांचा वसा पुढील पिढीला देण्यासाठी माऊलींचेच काही खास विचार शेअर करून हा दिवस त्यांच्या नामस्मरणामध्ये घालवू शकतात.
कोरोना नंतर यंदा पहिल्यांदाच हा संजीवन समाधी सोहळा निर्बंधमुक्त वातावरणामध्ये होणार आहे. त्यामुळे ज्ञानोबा दर्शनाला अनेक भाविक गर्दी करण्याची शक्यता आहे.
संत ज्ञानेश्वर यांचे विचार
संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा हा श्री गुरु हैबत बाबा यांच्या समाधी सोहळ्यापासून सुरू होतो.कार्तिकी अष्टमीला संजीव समाधी सोहळ्याला सुरुवात होते. तेथून कार्तिक अमावस्येपर्यंत या सोहळ्यात विविध कार्यक्रम असतात.
वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. त्यांची रचना देखील ज्ञानेश्वर महाराजांची आहे.