Sankashti Chaturthi June 2020: यंदा 8 जून रोजी संकष्टी चतुर्थी; काय आहे चंद्रोदयाची वेळ? जाणून घ्या पूजा विधी

गणेशभक्तांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी संकष्टी चतुर्थी जून महिन्यात आज 8 जून, सोमवार रोजी आहे. या दिवशी गणरायासोबत चंद्राची देखील पूजा केली जाते. त्यामुळे संकष्टी चतुर्थींच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ अत्यंत महत्त्वाची असते.

Sankashti Chaturthi June 2020 | (Photo Credits: Pixabay)

Sankashti Chaturthi June 2020 Moon Rise Time: शास्त्रानुसार, पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' (Sankashti Chaturthi) असे म्हणतात. तर अमावस्येनंतर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला 'विनायक चतुर्थी' असे म्हणतात. गणेशभक्तांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी संकष्टी चतुर्थी जून महिन्यात आज 8 जून, सोमवार रोजी आहे. या दिवशी गणरायासोबत चंद्राची देखील पूजा केली जाते. त्यामुळे संकष्टी चतुर्थींच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. कारण या वेळेत अनेक गणपती मंदिरांमध्ये पूजा-आरती केली जाते. घरोघरी गणेशभक्त पूजा करतात आणि चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो. दरम्यान सध्या संपूर्ण जगासह भारतावर कोरोना व्हायरसचे संकट आहे. या धोका टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन 5 सुरु आहे. या कालावधीत अनेक बाबतीत मुभा मिळाली असली तरी गर्दी करणे टाळायचे आहे. त्यामुळे यंदाही घरच्या घरी संकष्टी चतुर्थी निमित्त गणरायाची आराधना करा. (Ganeshotsav 2020: प्रभादेवी येथील सयानी रोडचा राजा सुद्धा यंदा 'मिनी बाप्पा' स्वरूपात येणार; कोरोना मुळे मंडळाने घेतले 'हे' मुख्य निर्णय)

यंदा संकष्टी चतुर्थी दिवशी काय आहे चंद्रोदयाची वेळ?

8 जून रोजी असणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. त्यानंतर चंद्रदर्शन करुन भाविकांना उपवास सोडता येईल.

संकष्टी चतुर्थी निमित्त गणरायाची पूजा कशी कराल?

यंदा संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिरात जावून गणरायाचे दर्शन घेता येणार नाही. परंतु, तुम्ही घरच्या घरी गणरायाची पूजा करु शकता. पाटावर गणरायाची मुर्ती/प्रतिमा मांडा. त्यापूर्वी मांडाखाली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू वाहा. पाटावर लाल वस्त्र अंथरा. गणेशाच्या मुर्ती/प्रतिमेला पाणी-दूधाचा अभिषेक करा. त्यानंतर हळद-कुंकू, अक्षता वाहा. गणरायाला प्रिय असलेले लाल जास्वंदाचे फुल, दुर्वा, शमीची पाने अर्पण केली जातात. मात्र सध्याच्या काळात सर्व वस्तू, फुले मिळणे शक्य होणार नसल्यास घरात असलेल्या वस्तूंसह पूजा करावी. दिवा-अगरबत्ती ओवाळावी. नारळ, फळांचा नैवेद्य दाखवावा. कापूर दाखवून आरती करा. चंद्रदर्शन घ्या. त्यानंतर गणरायाला उकडीच्या मोदकांचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवा.

आयुष्यातील संकट, विघ्न दूर करुन सुख, समृद्धी, आनंद, यश लाभावे म्हणून विघ्नहर्त्याची पूजा करुन त्याची प्रार्थना केली जाते. तुम्ही यंदा घराच्या घरी पूजा करुन कोरोना व्हायरसचे संकट लवकरात लवकर टळो, अशी प्रार्थना करा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now