Sankashti Chaturthi January 31 Chandrodaya Time: नववर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी आज; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी

यंदा एकाच महिन्यात दोनदा संकष्टी चतुर्थी आली आहे. आज नववर्षातील ही दुसरी संकष्टी चतुर्थी आहे.

गणपती बाप्पा (संग्रहित संपादित प्रतिमा)

Sankashti Chaturthi January 31 Moonrise Time: सर्व गणेशभक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस खास असतो. यंदा एकाच महिन्यात दोनदा संकष्टी चतुर्थी आली आहे. आज नववर्षातील ही दुसरी संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त गणेश मंदिरात भाविकांची मोठी गर्दी  होते. कोरोना संकटामुळे अनेक महिने बंद असलेली मंदिरं आता खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे उत्साहात मंदिरांमध्ये गर्दी करणे टाळायला हवे. घरातही मनोभावे पूजा-प्रार्थना करुन बाप्पाचा आशीर्वाद मिळवता येईल. (Sankashti Chaturthi Special Rangoli: संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचं रूप रांंगोळीतून साकारून दिवसाची करा मंगलमय सुरूवात!)

नववर्षातील दुसऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी काय आहे चंद्रोदयाची वेळ?

31 जानेवारी रोजी असणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी रात्री 9 वाजून 04 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. त्यामुळे ही वेळ साधून पूजा करता येईल आणि चंद्रदर्शन घेता येईल.

संकष्टी चतुर्थी निमित्त गणरायाची पूजा कशी करावी?

चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर गणराची मुर्ती/प्रतिमा मांडावी. चौरंग किंवा पाटाखाली रांगोळी काढून हळद-कुंकू वाहावे. मुर्ती-प्रतिमेवर दूध-पाण्याचा अभिषेक करुन हळद कुंकू, अक्षता वाहाव्या. फुलं, दुर्वा, शमीची पाने वाहावी. दिवा, अगरबत्ती ओवाळा. पुजेसमोर पानाचा विडा ठेवून त्याचीही पूजा करावी. पाच फळे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

संकष्टी चतुर्थी दिवशी गोडाधोडाचे जेवण करुन नैवेद्य दाखवला जातो. विशेष करुन मोदकांचा नैवेद असतो. ते शक्य नसल्यास एखादा गोडाचा पदार्थ केला जातो. त्यानंतर आरती करुन आकाशातील चंद्राचे दर्शन घेऊन मग उपवास सोडला जातो.