Sankashti Chaturthi December 2021: आज वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या तुमच्या शहरातील चंद्रोदयाच्या वेळा

त्यामुळे तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीचा उपवास करणार असाल तर पहा नेमकं आज रात्री चंद्रदर्शन महाराष्ट्र आणि आजुबाजूच्या भागात नेमकं कोणत्या वेळेला होणार आहे.

Sankashti Chaturthi 2021 ( Image Credit- Facebook)

आज (22 डिसेंबर) 2021 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) साजरी केली जात आहे. गणेशभक्तांसाठी आजची संकष्टी खास असण्यामागील अजून एक कारण म्हणजे ही संकष्टी मार्गशीर्ष महिन्यातील आहे. मराठी कॅलेंडर मधील हा नववा महिना हिंदू बांधवांसाठी धार्मिक दृष्ट्या पवित्र महिन्यांपैकी एक आहे. दर महिन्यात कृष्ण महिन्यातील चतुर्थीचा दिवस हा संकष्टी चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी चा दिवस आहे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि संकटांचे हरण करण्यासाठी गणरायाकडे मागणं मागण्यासाठी अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि व्रत करतात.

धार्मिक प्रथांनुसार, संकष्टी चतुर्थीचा उपवास किंवा व्रताची सांगता चंद्र दर्शनानंतर केली जाते. त्यामुळे तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीचा उपवास करणार असाल तर पहा नेमकं आज रात्री चंद्रदर्शन महाराष्ट्र आणि आजुबाजूच्या भागात नेमकं कोणत्या वेळेला होणार आहे. तुम्ही बाप्पाची आरती करून कधी करू शकता आज व्रताची सांगता?

संकष्टी चतुर्थी डिसेंबर 2021 चंद्रदर्शन वेळ

मुंबई - 20.48

पुणे- 20.45

रत्नागिरी- 20.50

नागपूर-20.18

गोवा-20.51

बेळगाव - 20.47

नाशिक- 20.42

संकष्टी चतुर्थी दिवशी बाप्पाचं मंदिरामध्ये जाऊन अनेकजण दर्शन घेतात. सध्या कोविड परिस्थितीमुळे भाविकांच्या संख्येवर बंधनं आली आहेत. मात्र गणरायाची पूजा तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता. आज नैवेद्यामध्ये मोदक बनवले जातात. काही घरांमध्ये गणपतीच्या नैवेद्यामध्ये कांदा-लसूण देखील व्यर्ज करण्याची पद्धत आहे.