Sankashti Chaturthi Chandrodaya Time Today: संकष्टी चतुर्थी दिवशी आज चंद्रोदयाची वेळ काय? पहा मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी मधील चंद्र दर्शन वेळ

संकष्टी चतुर्थी प्रमाणेच आज करवा चौथच्या व्रताची सांगता देखील चंद्रदर्शनाने होणार आहे. उत्तर भारतीयांमध्ये या करवा चौथ व्रताचे विशेष व्रत वैकल्य केले जाते.

Moon Photo (फोटो सौजन्य -X/@dominickmatthew)

Sankashti Chaturthi Moonrise Time Today: आज ऑक्टोबर महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा (Sankashti Chaturthi) दिवस आहे. गणेश भक्तांसाठी हा संकष्टी चतुर्थीचा दिवस खास असतो. दर महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्र दर्शनानंतर उपवास सोडला जातो. मनोकामना पूर्ण व्हावी आणि संकटाचा नाश व्हावा या धारणेमधून संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. मग आज मुंबई, पुणे,नाशिक, नागपूर सह बेळगाव, गोवा मध्ये चंद्रदर्शनाची वेळ काय आहे? हे देखील जाणून घ्या. नक्की वाचा: Sankashti Chaturthi 2024: संकष्टी चतुर्थीला करा हे 5 उपाय, कोणतेही संकट होणार दूर, ऐश्वर्य नांदेल घरात .

महाराष्ट्रामधील प्रमुख शहरांतील आजच्या चंद्रोदयाच्या वेळा काय?

मुंबई- 20.35

पुणे- 20.32

नाशिक- 20.28

नागपूर -20.03

गोवा- 20.39

बेळगाव-20.35

रत्नागिरी-20.38

कष्टी चतुर्थी च्या दिवशी गणरायाची विधिवत पूजा केली जाते. बाप्पाला दूर्वा, फूलं अर्पण केली जातात. नैवेद्याला उकडीचे मोदक बनवले जातात. गणेश मंदिरामध्ये जाऊन देखील अनेक भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. नियमित संकष्टीचा उपवास करणारी मंडळी बाप्पाची घरी देखील या दिवशी साग्रसंगीत पूजा करतात. उपवासाच्या जेवणात कांदा-लसूण विरहित जेवणाचा समावेश करतात.

आज करवा चौथ देखील आहे. संकष्टी चतुर्थी प्रमाणेच आज करवा चौथच्या व्रताची सांगता देखील चंद्रदर्शनाने होणार आहे. उत्तर भारतीयांमध्ये या करवा चौथ व्रताचे विशेष व्रत वैकल्य केले जाते.