Republic Day 2024: महिला कलाकार भारतीय वाद्ये वाजवून करणार पथसंचलनाची सुरुवात, 13,000 विशेष पाहुण्यांचा सहभाग; जाणून घ्या कसा असेल यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

प्रजासत्ताक दिनाचे संचलन सकाळी 10. 30 वाजता सुरू होईल आणि सुमारे 90 मिनिटे हे संचलन होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन होईल, यावेळी पंतप्रधान राष्ट्राचे नेतृत्व करत, देशाच्या संरक्षणार्थ हुतात्मा झालेल्या वीरांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण करणार आहेत.

Glimpses of Full Dress Rehearsal of Republic Day Parade

Republic Day: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 26 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी राष्ट्राचे नेतृत्व करतील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता,  एकता आणि प्रगती यासह वाढत्या स्वदेशी क्षमतांच्या पाठबळाने निर्माण झालेले लष्करी सामर्थ्य आणि वृद्धिंगत होणाऱ्या नारी शक्तीचे दर्शन घडवण्यासाठी कर्तव्यपथ सज्ज आहे.

'विकसित भारत' आणि 'भारत -लोकशाहीची जननी' या दुहेरी संकल्पनेवर आधारित, यावर्षीच्या संचलनामध्ये सुमारे 13,000 विशेष पाहुण्यांचा सहभाग असणार आहे. हा उपक्रम सर्व स्तरातील लोकांना या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देईल आणि सरकारमधील लोकसहभागाला प्रोत्साहन देईल.

प्रथमच, 100 हून अधिक महिला कलाकार भारतीय वाद्ये वाजवून पथसंचलनाची  सुरुवात करणार आहेत. या महिला कलाकारांद्वारे वाजवल्या जाणार्‍या शंख, नादस्वरम, नगारा इत्यादी वाद्य संगीताने संचलनाची सुरुवात होईल. कर्तव्यपथावर पथसंचलनामध्ये पहिल्यांदाच तिन्ही संरक्षण दलातील महिलांच्या एकत्र  तुकडीचा सहभाग देखील पाहायला मिळणार आहे. महिला वैमानिकही नारी शक्तीचे प्रतिनिधित्व करत हवाई संचलनादरम्यान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ)तुकड्यांमध्ये केवळ महिला जवान असणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाचे संचलन सकाळी 10. 30 वाजता सुरू होईल आणि सुमारे 90 मिनिटे हे संचलन होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन होईल, यावेळी पंतप्रधान राष्ट्राचे नेतृत्व करत, देशाच्या संरक्षणार्थ हुतात्मा झालेल्या वीरांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण करणार आहेत. त्यानंतर, पंतप्रधान आणि इतर मान्यवर संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी कर्तव्यपथावरील अभिवादन मंचाकडे जातील.

राष्ट्रपतीं के  अंगरक्षक'  या अंगरक्षकांच्या  संरक्षणात  राष्ट्रपती आणि त्यांच्या फ्रेंच समकक्षांचे आगमन होईल. ते राष्ट्रपतींचे अंगरक्षक भारतीय लष्करातील सर्वात वरिष्ठ रेजिमेंट आहे. हा प्रजासत्ताक दिन या विशेष रेजिमेंटसाठी खास आहे कारण 1773 मध्ये स्थापन ‘अंगरक्षक’ने आपल्या सेवेची 250 वर्षे पूर्ण केली आहेत. दोन्ही राष्ट्रपतींचे ‘पारंपारिक बग्गी’मधून आगमन होईल, ही पद्धत 40 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा सुरु होणार आहे. (हेही वाचा: Republic Day 2024 Maharashtra Tableau: यंदा प्रजासत्ताक दिनावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याला समर्पित असेल महाराष्ट्राचा चित्ररथ; जाणून घ्या काय आहे संकल्पना)

परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि त्यानंतर स्वदेशी तोफा प्रणाली 105-मिमी भारतीय फील्ड गनसह 21 तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीत होईल. 105 हेलिकॉप्टर युनिटचे चार एमआय -17 आयव्ही हेलिकॉप्टर्स कर्तव्यपथावर उपस्थित प्रेक्षकांवर पुष्पवर्षाव करतील. यानंतर ‘आवाहन’ या नारी शक्तीचे प्रतीक असलेल्या 100 हून अधिक महिला कलाकारांचा विविध प्रकारची तालवाद्ये वाजवणाऱ्या बँडचे  सादरीकरण होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now