Yoga Day 2019: 21 जून दिवशीच जागतिक योग दिन का साजरा केला जातो?

या दिवशी वर्षभरात सूर्य पहाटे सर्वात लवकर उगवतो तर संध्याकाळी उशिरा सुर्यास्त असतो. त्यामुळे या दिवसाचं औचित्य राखून जगभरात 'निरोगी आरोग्या'साठी योग दिन साजरा केला जातो

Yoga Day 2019 (File Photo)

International Yoga Day Celebration: योगशास्त्राचा उगम हा सुमारे 5000 वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीमध्ये झाला आहे. आज आपल्या प्राचीन वसांपैकी एक असलेलं हे योगशास्त्र जगभरात पसरलं आहे. केवळ आजारांवर मात करण्यासाठी नव्हे तर मानसिक आणि शारिरीक संतुलन ठेवण्यासाठी 'योग' हा फार महत्त्वाची भूमिका साकारतो. मागील 5 वर्षांपासून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्त्व आता जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहचलं आहे. पण हा आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून दिवशीच का साजरा केला जातो? याचं कारणही तितकंच खास आहे.  जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages

योग दिन 21 जून दिवशी का साजरा केला जातो?

उत्तर गोलार्धामध्ये असणार्‍या भागात 21 जून हा दिवस सगळ्यात मोठा दिवस आहे. या दिवशी वर्षभरात सूर्य पहाटे सर्वात लवकर उगवतो तर संध्याकाळी उशिरा सुर्यास्त असतो. त्यामुळे या दिवसाचं औचित्य राखून जगभरात 'निरोगी आरोग्या'साठी योग दिन साजरा केला जातो. यंदाचा जागतिक योगदिन 'Yoga For Heart' थीमवर; रांची मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साजरा करणार योगा डे!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत योग दिन साजरा करण्याबाबत एक प्रस्ताव मांडला. 2015 साली तो मान्य करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी175 देशांच्या सहप्रतिनिधींच्या संमतीने योग दिन सेलिब्रेशनच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला होता.

2019 साली म्हणजे यंदा Yoga For Heart या थीमवर जगभरात जागतिक योग दिन 2019 चं सेलिब्रेशन होणार आहे. भारत सरकारकडून रांची येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे 50,000 नागरिक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif