RR Patil Death Anniversary: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांची गाजलेली भाषणे

तासगाव विधानसभा मतदारसंघातून आर आर पाटील हे सलग आमदार राहिले. दमदार भाषण (Populer Speeches of RR Patil0 आणि ग्रामीण भागासोबत जोडलेली नाळ ही आर आर पाटील यांची प्रमुख ओळख होती. लोक प्रेमाने त्यांना 'आबा' म्हणत. आर आर पाटील यांच्या भाषणांचे किस्से आणि आठवणी आजही लोक मोठ्या आदराने सांगत असतात. अशा आर आर पाली यांच्या भाषणातील काही व्हिडिओ आज इथे देत आहोत.

RR Patil (File Photo)

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिवंगत आर आर पाटील यांची आज पुण्यतिथी (RR Patil Death Anniversary). 1991 ते 2015 या कळात आर आर पाटील ((RR Patil) हे महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचले. ग्रामिण भागातील सर्वपरिचीत चेहरा अशी त्यांची ओळख होती. तासगाव विधानसभा मतदारसंघातून ते सलग आमदार राहिले. दमदार भाषण (Populer Speeches of RR Patil0 आणि ग्रामीण भागासोबत जोडलेली नाळ ही आर आर पाटील यांची प्रमुख ओळख होती. लोक प्रेमाने त्यांना 'आबा' म्हणत. आर आर पाटील यांच्या भाषणांचे किस्से आणि आठवणी आजही लोक मोठ्या आदराने सांगत असतात. अशा आर आर पाली यांच्या भाषणातील काही व्हिडिओ आज इथे देत आहोत.

आर आर पाटील यांना थोडीफार राजकीय पार्श्वभूमी होती. त्यांचे वडील गावचे सरपंच होते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गवाात जन्मलेल्या आर आर पाटील यांना राकारणाची काहीसी पार्श्वभूमी होती. 16 ऑगस्ट 1957 या दिवशी आर आर पाटील यांचा जन्म झाला. वडील सरपंच असले तरी घरची परिस्थिती नेहमीच आर्थिकदृष्ट्या अडचणीची असायची त्यामुळे आर आर पाटील यांना शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागला. आर आर पाटील यांनी 'कमवा आणि शिका' योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सांगली येथील शांतिनिकेतन कॉलेजमधून बीए आणि एलएलबी असे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. (हेही वाचा, R R Patil 5th Death Anniversary: रावसाहेब रामराव पाटील अर्थातच महाराष्ट्राचे आर. आर. पाटील उर्फ आबा यांची राजकीय कारकिर्द, निर्णय आणि जीवनपट)

पंचायत समिती सांगली जिल्हा परिषद ते पुढे आमदार आणि मंत्री अशी मोठी मजल आर आर पाटील यांनी मारली. ते 1990,1995, 1999, 2004, 2009 आणि 2004 असे प्रदीर्घ काळ विधानसभेवर निवडूण गेले. या काळात त्यांनी ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कार्यभार सांभाळला. काही वक्तव्यांमुळे ते चर्चेत आले. पण तरीही जनमानसावर त्यांची पकड शेवटपर्यंत कायम राहिली.

महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद (Maharashtra Home Minister) आणि उपमुख्यमंत्रीपदही (Deputy Chief Minister) भूषवलेल्या आर आर पाटील यांनी राज्यातील जनतेच्या मनात खास स्थान निर्माण केले. मात्र, निधनाचे वय नसतानाही 16 फेब्रुवारी 2015 या दिशी मृत्यूने त्यांना गाठलं. लीलावती रुग्णालयात कर्करोगावर प्रदीर्घ काळ उपचार घेत असलेल्या आर आर पाटील नावाचा झंजावत शांत झाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now