Rani Lakshmibai Jayanti: ब्रिटीश सत्तेला आव्हान देणार्‍या रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी!

आज राणी लक्ष्मीबाईंच्या जयंती निमित्त जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी!

Rani of Jhansi, Lakshmibai (File Image)

भारतामधून ब्रिटिशांची सत्ता उलथून लावण्यासाठी पेटलेल्या 1857 च्या बंडामध्ये राणी लक्ष्मीबाई (Rani Laxmi Bai)यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अदम्य साहस दाखवत त्यांनी रणांवर पराक्रम जागवला. आज राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म दिवस (Rani Laxmi Bai Jayanti). 19 नोव्हेंबर 1828 दिवशी जन्मलेल्या राणी लक्ष्मीबाई आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. आज राणी लक्ष्मीबाईंच्या जयंती निमित्त जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी! राणी लक्ष्मीबाई जन्मदिन विशेष : आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटवणाऱ्या वीरांगनेची गाथा.

राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त खास गोष्टी!

ब्रिटिशांनी राणींचा उल्लेख `हिंदुस्थानची 'जोन ऑफ आर्क’ असा केला. तर झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्रांनी 1943 च्या ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव दिले.