Rama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व

नवमीची तिथी यंदा 21एप्रिलला 12:43 AM पासून 22 एप्रिलच्या 12:35 AM पर्यंत आहे.

Ram Navami 2021 | File Image

चैत्र महिन्यातील शुक्ल नवमीचा दिवस राम नवमी (Rama Navami) म्हणून ओळखला जातो. हा दिवस भगवान श्रीराम (Shri Ram) यांचा जन्मसिन म्हणून साजरा केला जातो त्यामुळे हिंदुधर्मियांसाठी हा दिवस अत्यंत खास असतो. भगावान श्रीरामांचा जन्म सूर्यवंशी इश्वांकू कुळामध्ये झाला होता. अयोद्धेच्या प्रजेसाठी ते राजे होते. हिंदू पुराणकथांनुसार भगवान श्रीराम हा विष्णू (Lord Vishnu) यांचा सातवा अवतार होता. चैत्र महिन्यात पहिले नऊ दिवस हे माता दुर्गेसाठी समर्पित केलेले असतात. त्यामुळे या काळात चैत्र नवरात्र साजरी केली आहे. या नवरात्रीच्या समाप्तीला राम नवमीचा सण असतो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार राम नवमी 21 एप्रिल 2021 दिवशी साजरी केली जाणार आहे.

राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देशभर राम मंदिरासोबतच घरा-घरामध्येही तयारी केली जाते. यंदा मात्र राम नवमी च्या भव्य सेलिब्रेशनवर कोरोना संकटामुळे काही निर्बंध असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात या दिवशी राम मंदिरांसोबतच शिर्डीच्या साई मंदिरामध्येही जल्लोष असतो. April 2021 Festival Calendar: यंदा एप्रिल महिन्यात गुड फ्रायडे, गुढी पाडवा, राम नवमी ते हनुमान जयंती पहा कोणत्या दिवशी?

राम नवमी तारीख वेळ, तिथी

राम नवमी यंदा बुधवार, 21 एप्रिल 2021 दिवशी साजरी केली जाईल. नवमीची तिथी यंदा 21एप्रिलला 12:43 AM पासून 22 एप्रिलच्या 12:35 AM पर्यंत आहे. धार्मिक कथांनुसार रामाचा जन्म हा मध्यान्हाला झाला असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे राम मंदिर आणि घराघरामध्ये दुपारी 12 च्या सुमारास प्रतिकात्मक स्वरूपात रामाचा पाळणा गात राम जन्मोत्सव साजरा करतात.

दशरथ आणि कौसल्या यांच्या पोटी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता. राम हे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे ज्येष्ठ बंधू होते. हिंदू कथांमध्ये प्रभू श्रीरामांचे वर्णन 'मर्यादापुरुषोत्तम' असं केले अअहे. ते एकवचनी, एकपत्नी होते. यासोबतच त्यांचे त्यांच्या भावंडांवर, आई-वडिलांवर नितांत प्रेम होते. प्रजेला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी ते बांधील असल्याने प्रजेसमोर त्यांनी स्वतःच्या भौतिक सुखांचा, कौटुंबिक सुखाचा देखील त्याग केला होता. ते एक आदर्श राजा मानले जात असल्याने त्यांच्या साम्राज्याला 'रामराज्य' संबोधले जात असे.

राम नवमी दिवशी प्रभू रामचंद्राची उपासना करताना भजन, श्रीरामाची गाणी, पाळणे, गीत रामायण गायलं जाते. काही ठिकाणी राम नवमी निमित्त रथ यात्रांचं आयोजन केलं जातं. राम-सीता स्वयंवर नाटुकलीच्या स्वरूपात सादर केलं जातं. मात्र यंदा कोरोना व्हायरसचं सावट असल्याने राम जन्मोत्सव देखील घरगुती आणि अत्यंत साध्या स्वरूपात साजरा केला जाणार आहे. काही रामभक्त राम नवमी दिवशी सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात.