Ram Navami 2019: गदिमा-सुधीर फडके यांनी साकारलेलं 'गीत रामायण' नेमकं कसं तयार झालं?
भाषांतरीत गीत रामायणदेखील बाबूजींच्या चालीवरच म्हटली जातात.
Geet Ramayan Concept: महाराष्ट्राचे गदिमा (G.D. Madgulkar) आणि बाबूजी यांनी यांची सादर केलेल्या 'गीत रामायणा'ला (Geet Ramayan) आता पन्नासहून अधिक वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र आजही त्याची गोडी कायम आहे. गजानन दिगंबर माडगूळकर (Gajanan Madgulkar) आणि सुधीर फडके (Sudhir Phadke) यांची रचना असलेलं गीत रामायण महाराष्ट्रासह भारतातील अनेक स्थानिक भाषांमध्ये बनवलं गेलं आणि त्यालादेखील रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला पण तुम्हांला ठाऊक आहे का? गीत रामायण बनवण्याची नेमकी संकल्पना कुणाची? आणि ते कसं तयार झालं? Happy Ram Navami 2019 Wishes: 'राम नवमी' च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी SMS, WhatsApp Status, GIFs आणि मराठमोळी शुभेच्छापत्र!
गीत रामायणाची संकल्पना कुणाची?
गीत रामायण एप्रिल 1955 ते 56 या काळात तयार झालं. वाल्मिकींच्या रामायणाच्या आधारावर गदिमांनी 'गीत रामायण' रचलं आणि सुधीर फडके यांनी त्याला संगीत दिलं. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून 'गीत रामायण' पहिल्यांदा प्रसारित करण्यात आलं. भारतामध्ये टेलिव्हिजन येण्यापूर्वी सुमारे चार वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या माध्यमातून गीत रामायण रसिकांच्या भेटीला आलं.
सीताकांत लाड हे आकाशवाणी पुणे केंद्राचे स्टेशन डायरेक्टर होते.आकाशवाणीवर काही समाजप्रबोधनपर पण त्यासोबतच काही मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरू करण्याची इच्छा त्यांनी गदिमांना ऐकवली. यामधूनच 'गीत रामायण' ही संकल्पना समोर आली. Ram Navami 2019: यंदा 13 एप्रिलला साजरी होणार राम नवमी; पहा नक्षत्र, तिथीची शुभ वेळ काय?
कसं आहे गीत रामायण
गीत रामायण साकारताना गदिमांनी त्यामध्ये विविध रस, वृत्त आणि छंदांचा वापर केला. संगीतकार सुधीर फडके यांनी भारतीय रागांचा समावेश करत गीत रामायणाला स्वरसाज चढवला. लता मंगेशकर, माणिक वर्मा, सुधीर फडके यांच्या आवाजात गीत रामायण रेकॉर्ड करण्यात आलं. गीतरामायणामध्ये एकूण 56 गाणी आहेत. येथे ऐका गीत रामायण
पुढे पुस्तक रूपातून 'गीत रामायण' प्रसिद्ध करण्यात आलं. मराठी प्रमाणेच हिंदी, तमीळ, बंगाली, कोकणी, कानडी भाषेमध्येही गीत रामायण भाषांतरीत करण्यात आलं आहे. भाषांतरीत गीत रामायणदेखील बाबूजींच्या चालीवरच म्हटली जातात. आता ऑनलाईन स्वरूपातही गीत रामायण उपलब्ध आहे.