Ram Navami Special Recipes: रामनवमी निमित्त घरच्या घरी बनवा सुंठवड्याच्या प्रसादासह काही स्वादिष्ट रेसिपीज
त्याचे कारण म्हणजे चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो आणि या ऋतूत होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, अॅलर्जी असे त्रास होतात. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुंठवडा हा फार गुणकारी ठरतो. तसेच तेलुगु लोक या दिवशी पनक्कम हा पदार्थ बनवतात.
Ram Navami 2020 Recipes: चैत्र शुद्ध नवमीला संपूर्ण देशभरात रामनवमीचा (Ram Navami) उत्साह मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा संपू्ण देशावर कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी यंदा रामनवमी निमित्त ठिकठिकाणी होणारे कार्यक्रम, भंडारा, राम जन्मोत्सव सोहळा रद्द करण्यात आले आहेत. लोकांना घराबाहेर पडता येत नसल्याकारणाने आता हा उत्साह साजरा करायचा कसा असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यासाठी अजिबात चिंता करण्यासाठी गरज नाही. तुम्ही घरच्या घरी छान स्वादिष्ट रेसिपीज बनवून आपल्या कुटूंबासह हा सण साजरा करु शकतात.
रामनवमीला सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो. त्याचे कारण म्हणजे चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो आणि या ऋतूत होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, अॅलर्जी असे त्रास होतात. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुंठवडा हा फार गुणकारी ठरतो. तसेच तेलुगु लोक या दिवशी पनक्कम हा पदार्थ बनवतात.
पाहूयात या स्वादिष्ट पदार्थाच्या रेसिपीज:
सुंठवडा
पानकम
साबुदाणा खीर आणि ज्यूस
हेदेखील वाचा- Ram Navami 2020: रामनवमी चे व्रत करण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा कायम ध्यानात
रोट
कोसांबरी
वर सांगितल्याप्रमाणे ऋतूतील बदलामुळे असे औषधी आणि गुणकारी रेसिपीज घरी बनवून आपल्या कुटूंबाला वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवले पाहिजे. रामनवमीला पूर्ण दिवस उपवास धरुन दुस-या दिवशी दशमीला व्रत सोडावे. असे केल्यास मानसिक समाधान मिळते आणि प्रभू कायम आपल्यावर कृपादृष्टी राहते असे पुराणात म्हटले आहे. त्यामुळे हे पदार्थ तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकतात.