Ram Navami 2022 Date: राम नवमी यंदा 10 एप्रिल दिवशी; जाणून घ्या राम जन्म, पूजेची वेळ काय?
लोक मानतात की भगवान सूर्याचे वंशज हे रामाचे पूर्वज होते.
हिंदू नववर्षाची सुरूवात चैत्र पाडवा (Chaitra Padwa) दिवशी झाल्यानंतर नवव्या दिवशी राम नवमी (Ram Navami) साजरी करण्याची प्रथा आहे. चैत्र महिन्यातील नवमी ही राम नवमी अर्थात श्रीरामाचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा हा राम नवमीचा सोहळा 10 एप्रिल दिवशी साजरा केला जाणार आहे. देशभर कोरोना संकट आटोक्यात असल्याने यावर्षी दोन वर्षांनंतर देशात पुन्हा मोठ्या जल्लोषात राम नवमी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी रामभक्तांमध्ये लगबग सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही सारे कोविड 19 निर्बंध उठवण्यात आल्याने यंदा राज्यातही राम नवमी मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये साजरी केली जाईल. हे देखील नक्की वाचा: Ram Navami Special Recipes: रामनवमी निमित्त घरच्या घरी बनवा सुंठवड्याच्या प्रसादासह काही स्वादिष्ट रेसिपीज.
राम नवमी 2022 तारीख वेळ
राम नवमी दिवशी श्रीरामाचा जन्म मध्यान्ह म्हणजेच दुपारी 12 च्या सुमारास साजरा केला जातो. पाळणा गाऊन राम लल्लाला पाळण्यात झोपवून त्याचा जन्म सोहळा दरवर्षी साजरा करण्याची पद्धत आहे.
यंदा राम नवमी तिथी 10 एप्रिल दिवशी पहाटे 1 वाजून 23 मिनिटांनी सुरू होणार असून समाप्ती 11 एप्रिल दिवशी पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे.
राम नवमी दिवशी रामायण सादर करण्याची रीत आहे. यानिमित्त रामायणातील काही प्रसंग लहान नाटुकल्यांच्या रूपात सादर केल्या जातात. रामभक्त दिवसभर उपवास करतात. राम जन्म साजरा करताना खीरीचा गोड नैवेद्य बनवण्याची देखील रीत आहे.
रामनवमी उत्सवाची सुरुवात जल (पाणी) अर्पण करून आणि भगवान सूर्याकडून पहाटे आशीर्वाद घेण्याने होते. लोक मानतात की भगवान सूर्याचे वंशज हे रामाचे पूर्वज होते.
(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. त्यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली पुष्टी करत नाही.)