Ram Navami 2019: यंदा 13 एप्रिलला साजरी होणार राम नवमी; पहा नक्षत्र, तिथीची शुभ वेळ काय?
यंदा राम नवमी 14 नव्हे 13 एप्रिलला होणार साजरी, पहा चैत्र नवरात्रीच्या आठव्या दिवशीच यंदा का साजरी होणार राम नवमी
Ram Navami 2019 Date and Time: विष्णूचा सातवा अवतार म्हणजे भगवान राम. चैत्र शुक्ल नवमीला म्हणजेच चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी राम जन्म सोहळा साजरा केला जातो. यंदा तिथी विभागून आल्याने नेमकी राम नवमी (Ram Navami) कधी साजरी करायची? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. मात्र ज्येष्ठ पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा राम नवमी शनिवार, 13 एप्रिल 2019 दिवशी साजरी केली जाणार.
गुढीपाडव्यानंतर आठव्या दिवशी राम नवमी ?
चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्ष सुरू होतं. गुढी पाडव्यापासून नवव्या दिवशी राम नवमी साजरी केली जाते. मात्र पौराणिक कथेनुसार, चैत्र शुक्ल नवमी मध्यान्ही असेल त्यावेळी दिवशी रामजन्म साजरा केला जातो. यावर्षी शनिवार दि. 13 एप्रिल दिवशी मध्यान्ही नवमी असल्यामुळे श्रीराम नवमी 13 एप्रिलला साजरी करावयाची आहे. राम जन्मोत्सव दुपारी बारा वाजता साजरा केला जातो.
नक्षत्र, तिथी वेळ
दाते पंचांगानुसार, चैत्र शुक्ल अष्टमी 13 एप्रिल दिवशी 11.42 वाजता संपते तर नवमी 14 एप्रिल दिवशी 9.36 वाजता संपते. यादरम्यान 13 एप्रिल दिवशी पुर्नवसू नक्षत्र 8.59 वाजता संपणार असून 14 एप्रिल दिवशी पुष्य नक्षत्र 7.40 वाजता संपणार आहे.
राम जन्म अयोद्धेमध्ये झाला असला तरीही महाराष्ट्रभर स्थानिक राम मंदिरांमध्ये, शिर्डी साई मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव साजरा केला जातो.