Raksha Bandhan 2024 Wishes In Marathi: रक्षाबंधन निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारे साजरा करा बहिण-भावाच्या नात्याचा मंगलमय दिवस!

या दिवशी तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला खालील WhatsApp Status, Facebook Messages द्वारे खास शुभेच्छा पाठवू शकता.

Raksha Bandhan 2024 Wishes 6 (Photo Credit - File Image)

Raksha Bandhan 2024 Wishes In Marathi: रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला पूर्ण आदर आणि सन्मान करणारा एक पवित्र सण आहे. यंदा हिंदू कॅलेंडरनुसार राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त 19 ऑगस्ट रोजी दुपारी 01:32 ते रात्री 09:07 पर्यंत असेल. यावेळी तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. रक्षाबंधन हा सण अत्यंत शुभ मानला जातो. भाऊ आणि बहीण यांच्यातील अतूट प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा सण आहे.

हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी प्रार्थना करते. या दिवशी तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला खालील WhatsApp Status, Facebook Messages द्वारे खास शुभेच्छा पाठवू शकता. (हेही वाचा - Raksha Bandhan Gift Ideas for Sisters: रक्षाबंधन निमित्त बहिणीला द्या 'या' भेटवस्तू; गिफ्ट पाहून बहिणीचा दिवस होईल खास)

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,

घेऊन आला हा श्रावण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,

म्हणून भाऊ- बहिणीचं हे नातं

खूप खूप गोड आहे.

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तूच माझा आधार तूच माझं सर्वस्व..

देवाचे आभार तुझ्या

रुपाने ताई मला दिला मोठा आधार,

ताई तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहीण असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते

लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण

कोणीच नसते नशीबवान असतात

ते ज्यांना बहीण असते

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

धार्मिक मान्यतेनुसार या शुभ मुहूर्तावर देवाला देखील राखी बांधण्याची परंपरा आहे. हा दिवस सर्व घरांमध्ये वेगवेगळ्या श्रद्धा आणि प्रेमाच्या भावनांनी साजरा केला जातो. यंदा राखीचा सण सर्वांनाच लाभदायक आहे. हा दिवस श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आणि पौर्णिमा देखील आहे. या काळात सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, शोभन योग आणि श्रवण नक्षत्र यांचा उत्तम संयोगही तयार होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif