Raksha Bandhan 2022 Messages: रक्षाबंधन सणानिमित्त खास मराठी Wishes, WhatsApp Status, Greetings पाठवून साजरा बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव
श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. त्यावेळी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांध होती. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला.
भारतीय हिंदू संस्कृतीनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन (Raksha Bandhan 2022) हा सण साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या स्नेहाला राखीच्या पवित्र बंधनात बांधतो. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर टिळा लावून, त्याचे औक्षण करून, त्याच्या उजव्या मनगटावर राखी बांधते. यंदा गुरुवार, म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. भावाचा उत्कर्ष व्हावा, तसेच भावाकडून सदैव आपले रक्षण व्हावे हीच या सणामागची बहिणीची भावना असते.
राखी या शब्दामध्ये, ‘रक्षण कर म्हणजेच सांभाळ कर’, असा संकेत देण्यात आला आहे. नात्याचे रक्षण करणे हाच यातील गर्भितार्थ आहे. राखी बांधून घेण्याचा अर्थ म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला बांधून घेऊन, तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. अशा प्रकारे या दिवशी, कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून, हे पोवते कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.
या दिवसाचे औचित्य साधून खास Wishes, Messages, WhatsApp Status, Greetings च्या माध्यमातून तुम्ही आपल्या भावाला किंवा बहिणीला शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, इतिहासामध्ये रक्षाबंधन सणाचे अनेक दाखले आढळतात. श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. त्यावेळी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांध होती. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला. (हेही वाचा: नारळी पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे शेअर करून साजरा करा खास दिवस!)
इतिहासातील दुसरे उदाहरण म्हणजे, चित्तौढगडची राणी कर्मावती हिने बहादुरशाहपासून आपली रक्षा करण्यासाठी मुघल बादशाह हुमायूला राखी पाठवली होती. या राखीचा मान राखून राजा हुमायूने राणी कर्मावतीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली.