Raksha Bandhan 2021 Quick Mehndi Designs: रक्षाबंधन निमित्त हातावर काढा 'या' कमी वेळात काढता येणाऱ्या सोप्या मेहंदी डिझाइन
या दिवसासाठी ती केवळ सुंदर राखी विकत घेत नाही, तर तिच्या हातावर मेहंदी पण काढते.
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन यावर्षी 22 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. दरवर्षी राखीच्या या शुभ प्रसंगी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या सणाच्या दिवशी बहिणींमध्ये खूप उत्साह पहायला मिळतो . या दिवसासाठी ती केवळ सुंदर राखी विकत घेत नाही, तर तिच्या हातावर मेहंदी पण काढते. सणासुदीला मेहंदी काढणे शुभ मानले जाते म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी हातावर मेहंदी काढली जाते. तुम्ही ही रक्षाबंधनाच्या दिवशी मेहंदी काढणार असाल आणि मेहंदी डिझाइनच्या शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास रक्षाबंधनासाठी सोप्या आणि कमी वेळात काढता येतील अशा सोप्या डिझाइन. (Raksha Bandhan 2021 Gift Idea: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'हे' गिफ्ट्स देऊन करा खुश)
रक्षाबंधन स्पेशल अरेबिक मेहंदी डिझाइन
सोपी मेहंदी डिझाइन
कंगवा आणि फोकच्या साहाय्याने काढा सोपी मेहंदी
रक्षाबंधन स्पेशल मेहंदी डिझाइन
रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणीच्या भावनिक बंधनाचे प्रतीक मानले जाते.यंदा 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे.