Rajarshi Shahu Maharaj: राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन; कोल्हापूर राहणार 100 सेंकंदासाठी स्तब्ध, कारण घ्या जाणून
दरम्यान, छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे देखील कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.
Rajarshi Shahu Maharaj Death Anniversary: राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj Death Anniversary) यांची आज 101वा स्मृती दिन. त्यानिमित्त कोल्हापूरकर (kolhapur People) अनोखे अभिवादन करणार आहेत. राजर्षी शहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरकरांनी आपण आहे त्या जागी 100 सेकंद स्थब्द उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन करावे, असे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे देखील कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. कोल्हापूर येथील शाहू स्मृती समाधी स्थळावर जऊन ते अभिवादन करणार आहेत.
यंदाचे वर्ष (2022-23) हे छत्रपती शाहू महाराज यांचे शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त शाहू महाराज यांचे विचार समाजात आणि घराघरात पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षाची लवकरच सांता होत आहे. त्यामुळे प्रशासनाने दिनांक 6 ते 14 मे या काळात कृतज्ञता पर्वाचे आयोजन केले आहे. या पर्वाची सुरुवात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सकाळी सव्वादहा वाजता शाहू मिल येथे होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहेत. (हेही वाचा, Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2023 HD Images: छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून करा त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन!)
दरम्यान, सकाळी दहा वाजता कोल्हापूरकर शंभर सेकंद उपस्थित राहतील आणि राजर्शी शाहू महाराज यांना आदरांजली अर्पण करतील. याशिवा शाहू समाधी स्थळ येथे दहा हजार शाहू प्रतिमांचे वाटप केले जाणार आहे. नंतर शाहू स्मारक येथे सामाजिक न्याय परिषद पार पडेल. विविध ठिकाणी वृक्षारोपणही केले जाईल.