Rabi-ul-Awwal 2019: ‘रबी उल अव्वल’च्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कधी आहे ‘ईद-ए-मिलाद’

मंगळवारी चंद्र दिसल्याने रबी-उल अव्वलला सुरुवात झाली. तसेच येत्या 10 नोव्हेंबरला ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ हा सण साजरा होणार आहे.

Rabi-ul-Awwal 2019 (Photo Credits: Unsplash)

Rabi-ul-Awwal 2019: मुस्लिम बांधव वर्षभर वाट पाहात असलेल्या ‘रबी उल अव्वल’च्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी चंद्र दिसल्याने रबी-उल अव्वलला सुरुवात झाली. तसेच येत्या 10 नोव्हेंबरला ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ हा सण साजरा होणार आहे. हा सण मुस्लिम बांधवांच्या अनेक मोठ्या सणांपैकी एक आहे. मुस्लिम बांधव पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आनंद म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. (हेही वाचा - दिवाळीच्या प्रदूषणामुळे कोरडी झाली त्वचा? नो टेन्शन, 'या' सोप्या उपायांनी पुन्हा प्राप्त करा नितळ आणि मुलायम चेहरा)

इस्लाम धर्मानुसार, पैगंबर हजरत मोहम्मद हे शेवटचे संदेशवाहक आणि सर्वात महान संदेष्टे मानले जातात. ज्यांना खुद्द अल्लाहने देवदूत जिब्रईलद्वारा कुराणचा संदेश दिला होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांनी नेहमी शांततेचा संदेश दिला. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. ईद-ए-मिलाद सणाविषयी या समाजात वेगवेगळी मते आहेत.  शिया आणि सुन्नी यांची या दिवसाबद्दल स्वत:ची अशी मते आहेत.

हेही वाचा - Bhaubeej 2019: भाऊबीजे निमित्त ओवाळणीत चुकूनही देऊ नका ह्या '3' गोष्टी ज्या मानल्या जातात अशुभ

ईद-ए-मिलाद या दिवशी मुस्लिम बांधव पैगंबर मोहम्मद यांच्या प्रतीकात्मक पावलांची पूजा करतात. या दिवशी पैगंबराच्या मोठमोठ्या मिरवणूकही काढल्या जातात. या दिवशी इस्लामचा सर्वात पवित्र ग्रंथ कुराणाचेही वाचण केले जाते. तसेच लोक या दिवशी मक्का-मदिनाला जातात. ईद-ए-मिलादच्या दिवशी मुस्लिम बांधव नमाज पाडतात. या दिवशी सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.



संबंधित बातम्या