Rabi ul Awwal 1442 Moon Sighting: ईद-ए-मिलाद-उन-नबी भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि UAE येथे कधी साजरा केला जाणार, येथे पहा तारीख

दरम्यान भारत, पाकिस्तान, बांग्लादेशसह काही देशांमध्ये शनिवारी चंद्राचे दर्शन झाले नाही. त्यानंतर आता 30 ऑक्टोंबर रोजी ईद-ए-मिलाद-उन नबी साजरा केला जाणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Getty Images)

Rabi ul Awwal 1442 Moon Sighting:  इस्लाम धर्मातील पाक महिन्यात रबी उल अव्वल चा महिना म्हणजेच उद्या (18 ऑक्टोंबर) मगरिब नंतर सुरु होणार आहे. दरम्यान भारत, पाकिस्तान, बांग्लादेशसह काही देशांमध्ये शनिवारी चंद्राचे दर्शन झाले नाही. त्यानंतर आता 30 ऑक्टोंबर रोजी ईद-ए-मिलाद-उन नबी साजरा केला जाणार आहे. तर सौदी अरेबिया सारख्या काही देशात 29 ऑक्टोंबरलाच ईद-ए-मिलाद-उन-नबी (Eid Milad un Nabi) साजरा केला जाईल.

सौदी अरेबिया, दुबई, श्रीलंका सारख्या देशात एक दिवस आधीच हा सण साजरा केला जाणार आहे. जो या देशात आजपासूनच रबी उल अव्वलचा महिना सुरु झाला आहे. तसेच 29 ऑक्टोंबरला या देशात ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरा केला जाणार आहे.या देशात रविवारी मगरिब नंतरच रबी उल अव्वलचा महिना सुरु होणार आहे. तर सौदी अरेबिया सारख्या देशात आजपासूनच मगरिब नंतर रबी उल अव्वलचा महिना सुरु झाला आहे. तर भारत, पाकिस्तान, बांग्लादेश मध्ये उद्यापासून मगरिब नंतर रबी उल अव्वलचा महिना सुरु होणार आहे.(Eid-e-Milad Wishes and Messages: ईद- ए- मिलाद उन नबी च्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, WhatsApp Status Images आणि WhatsApp Stickers च्या माध्यमातून देऊन करा साजरा ईद मिलाद उन नबी चा सण)

तर इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार पैगंबर मुहम्मद साहब यांना अल्लाहने जमीनीवर दया आणि शांतीसाठी पाठवले होते. असे मानले जाते की, पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांना ज्यावेळी या जगात पाठवले होते जेव्हा वाईटपणा ही एक सामान्य गोष्ट झाली होती. त्यांनी नेहमीच शांती आणि सामुदायिक सद्भाव यांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले होते. या सणाच्या महिन्यात चांगली कामे आणि उपासना केली जाते. 12 रबी उल अव्वल या दिवशी पैगंबर मोहम्मज हजरत साहब यांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या महत्वांच्या पैलूंचे अवगत केले जाते. ज्या लोकांकडे पैसे असतात ते या दिवशी मक्का-मदीना येथे जातात. इस्लामिक धर्मात पैगंबर मुहम्मद साहब यांना सर्वाधिक मानले जाते. ईद-ए-मिलाज उन नबी या दिवशी जुलूस काढले जातात. नमाज पठन करुन ईदीचा सण साजरा केला जातो.



संबंधित बातम्या

West Indies vs Bangladesh 1st Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला किती वाजता होणार सुुरुवात, भारतात कोणत्या ओटीटी सामन्यावर घेणार लाइव्ह सामन्याचा आनंद? घ्या जाणून

West Indies vs Bangladesh Test Series 2024 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात 22 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार कसोटी मालिका; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल

WI vs BAN Test Series 2024 Schedule: वेस्ट इंडिज-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या कधी, कुठे कसा खेळवले जाणार सामने

Afghanistan vs Bangladesh 3rd ODI 2024 Preview: अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगणार तिसरा एकदिवसीय सामना, विजयी संघ मालिकेवर करणार कब्जा; त्याआधी जाणून घ्या सामन्याबद्दल संपुर्ण तपशील