Quick 10-Minute Desserts for Raksha Bandhan 2023: अवघ्या 10 मिनिटांत बनवा रक्षाबंधन साठी यंदा घरीच नारळाची बर्फी, लाडू ते बदाम कतली; इथा पहा रेसिपीज (Watch Video)

या दिवशी भावाने आपलं रक्षण करावं या अपेक्षासह बहिणी त्याच्या हातावर राखी बांधते.

Peda (Photo Credits: Wikimedia Commons)

श्रावण महिना सुरू झाला की सणांची रेलचेल सुरू होते. नागपंचमी नंतर आता हिंदू धर्मीय नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यास उत्सुक आहे. रक्षा बंधन आणि नारळी पौर्णिमा यांच्या अनुषंगाने घरात गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. या दिवशी नारळाचे पदार्थ बनवण्याची रीत आहे. मग नारळासोबतच अन्य काही पदार्थांच्या मदतीने तुम्ही झटपट कोणकोणते गोडाचे पदार्थ बनवून भावाचा आणि तुमच्या कुटुंबियांचा रक्षाबंधनाचा सण अजून थोडा स्पेशल करू शकता हे नक्की पहा.

नारळापासून नारळी भात, राघवदास लाडू , नारळाची बर्फी बनवली जाऊ शकते. यासोबतच अनेकजण सणाच्या निमित्ताने लाडू, गुलाबजाम, पेढे, बर्फी असे पदार्थ घरीच बनवू शकतात. यामुळे भेसळयुक्त मिठाईचा देखील धोका कमी होतो. नक्की वाचा: Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाची तारीख आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या रक्षाबंधन सणाचे विशेष महत्त्व आणि इतिहास.

रक्षाबंधन निमित्त झटपट घरगुती मिठाईचे पर्याय

राघवदास लाडू

नारळाची बर्फी

बदाम कतली

रक्षाबंधन यंदा 30 ऑगस्ट दिवशी साजरं केलं जाणार आहे. या दिवशी भावाने आपलं रक्षण करावं या अपेक्षासह बहिणी त्याच्या हातावर राखी बांधते, त्याचं औक्षण करते. दरम्यान हा सण बहिण-भावाच्या जिव्हाळ्याचं नातं अधिक दृढ करण्यासाठी साजरा केला जातो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif